Bride refused to marry groom in Bulandshahar because she don't like Groom | आता काय बोलावं! भांगेत कुंकू भरल्यावर नवरीने लग्नास दिला नकार, कारण वाचून चक्रावून जाल!

आता काय बोलावं! भांगेत कुंकू भरल्यावर नवरीने लग्नास दिला नकार, कारण वाचून चक्रावून जाल!

लग्न म्हटलं की, काहीना काही विचित्र घटना समोर येतातच. कधी भांडणामुळे लग्न गाजतं नाही तर जेवणामुळे वाद होतात. लग्न मंडपात जाऊन नवरीने लग्नास नकार दिल्याच्याही अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. याची विचित्र कारणेही समोर आली होती. अशीच एक घटना यूपीच्या बुलंदशहरमधून समोर आली.

बुलंदशहर येथील खुर्जा नगर भागातील मंदिर रोडवरील एका लग्न मंडपात हा गोंधळ झाला. सोमवारी रात्री सुरू असलेल्या या लग्न समारोहात नवरदेवाने नवरीच्या भांगेत कुंकू भरलं. आणि त्यानंतर अचानक नवरीने पुढील रिवाज पूर्ण करण्यास नकार दिला. कारण नवरीला नवरदेव आवडला नव्हता. आता वेळेवर नवरीने असं केल्याने दोन्ही पक्षांमध्ये यावरून वाद पेटला. (हे पण वाचा : खतरनाक ट्विस्ट! लग्नाच्या दिवशी नवरदेवाला समजलं, नवरी त्याची बहीण आहे आणि मग....)

खुर्जा येथील नवदुर्गा शक्ती मंदिर चौकी भागातील एका लग्न मंडपात लग्न होत होतं. नवरदेवाने नवरीच्या भांगेत कुंकू भरलं. अशात अचानक नवरीने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे सगळेच हैराण झाले. नवरीने सांगितले की, तिला नवरदेवाचा जो फोटो दाखवण्यात आला होता त्यात तो चांगला दिसत होता. पण समोरासमोर चांगला नाही दिसत. (हे पण वाचा : ठरलं तर! अडीच फूट उंचीच्या अजीमला मिळाली नवरी, वाचा काय करते मुलगी आणि बघा तिचा फोटो!)

यानंतर विवाहस्थळी दोन्ही परिवारांमध्ये वाद पेटला. बघता बघता वाद इतका पेटला की, लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली गेली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वातावरण शांत केले. बराचवेळ लोकांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काही लग्नासाठी तयार झाली नाही. त्यामुळे नवरदेव वरात घेऊन माघारी गेला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच यूपीमध्येच अशीच एक घटना समोर आली होती. त्या लग्नातही नवरीने लग्न करण्यास नकार दिला होता. यावेळी या नवरीने कारण दिलं होतं की, तिला वेगळ्या मुलाचा फोटो दाखवण्यात आला होता आणि लग्नात नवरदेव दुसराच बनून आला आहे. त्यामुळे हे लग्न कॅन्सल करण्यात आलं होतं.
 

Web Title: Bride refused to marry groom in Bulandshahar because she don't like Groom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.