शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बोंबला! लग्नात नवरदेवाने फोटोग्राफर आणला नाही म्हणून नवरीने लग्नास दिला नकार आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:05 IST

Bride refuse to marry : कानपूरमधून (Kanpur) एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका नवरीने लग्न करण्यास नकार दिला. याचं कारण वाचून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

देशात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे लग्नातील एक मजेदार, वादग्रस्त व्हिडीओ नेहमीच बघायला मिळतात. लग्नासंबंधी वेगवेगळ्या विचित्र घटनाही समोर येतात. जसे की, नवरी लग्नाच्या दिवशी पळून गेली तर कुठे नवरदेवाने वेळेवर लग्नास नकार दिला अशा घटना समोर येत असतात. अशात उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमधून (Kanpur) एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका नवरीने लग्न करण्यास नकार दिला. याचं कारण वाचून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कानपूरच्या देहातच्या एका गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न भोगनीपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत ठरलं होतं. मंडप सुंदर सजवण्यात आला. वरात आली तेव्हा पाहुण्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर नवरी आणि नवरदेव हार घालण्यासाठी स्टेजवर पोहोचले. तेव्हा नवरीच्या लक्षात आलं की, हे यादगार क्षण कैद करण्यासाठी फोटोग्राफरच नाहीये. अशात नवरीने लग्नास नकार दिला. इतकंच नाही तर स्टेजवरून खाली उतरून नवरी शेजारच्या घरी निघून गेली.

वेळेवर झालेल्या या गोंधळानंतर सर्वांनी नवरीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती म्हणाली की, ज्या व्यक्तीला आज आमच्या लग्नाबाबत काहीच वाटत नाही, तो भविष्यात माझा सांभाळ कसा करेल? परिवारातील वृद्ध लोकांनीही तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही.

वाद इतका पेटला की, हे प्रकरण नंतर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं. इथे दोन्ही पक्षांनी देण्यात आलेले पैसे आणि दागिने परत करण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधिकारी डोरी लाल म्हणाले की, प्रकरण दोन्हीकडील लोकांच्या सहमतीने सोडवण्यात आलं. ते म्हणाले की, दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या वस्तू आणि पैसे परत केले. त्यानंतर नवरदेव नवरीला न घेताच आपल्या गावी परत गेला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेmarriageलग्न