लग्न लागणार इतक्यात नवरीच्या आईने केस खेचत नवरदेवाची केली धुलाई, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:31 IST2021-08-02T12:31:25+5:302021-08-02T12:31:53+5:30

हरदोईच्या निजामपूर गावातील एक तरूण त्याच्या समाजातील एका तरूणीला काही दिवसांपूर्वी पळवून घेऊन गेला होता.

Bride mother beat up the groom at the time of marriage in hardoi UPP | लग्न लागणार इतक्यात नवरीच्या आईने केस खेचत नवरदेवाची केली धुलाई, कारण....

लग्न लागणार इतक्यात नवरीच्या आईने केस खेचत नवरदेवाची केली धुलाई, कारण....

यूपीच्या हरदोईमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे प्रेयसीला पळवून नेणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांचा निकाह ठरला. पण ऐनवेळी नवरीच्या आईला राग आणि आणि समोर होता नवरदेव. तेव्हा होणाऱ्या सासूने जावयाची चांगलीच धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

हरदोईच्या निजामपूर गावातील एक तरूण त्याच्या समाजातील एका तरूणीला काही दिवसांपूर्वी पळवून घेऊन गेला होता. दोघांचंही अनेक वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. तरूणीच्या आईने पोलिसात तक्रार दिली होती की तरूण बाबरने काही रक्कम आणि दागिन्यांसोबत मुलीला पळवून नेलं. त्यानंतर पोलिसांना तरूण आणि तरूणीला कन्नौ गावात ताब्यात घेतलं.

तरूण आणि त्याचा परिवार अडचणीत येऊ नये म्हणून तरूणीने लगेच निकाह करण्याची तयारी दाखवली. पण तरूणीची आई या निकाहसाठी तयार नव्हती. यादरम्यान निकाहची तयारी झाली आणि तिला पुढे नेण्यात येत होतं. तेव्हाच घटनास्थळी तरूणीची आई पोहोचली. तरूणीची आई रागाने लाल झालेली होती. तिने नवरदेवाला पाहताच त्याला मारहाण सुरू केली. त्याचे केस खेचून त्याला मारहाण केली.

मात्र, तरूण आणि तरूणी दोघेही वयस्क असल्याने पोलिसांनी दोघांच्याही परिवारांना समजावून सांगून दोघांचा निकाह करून दिला. पोलीस म्हणाले की, तरूण आणि तरूणी दोघेही वयस्क आहे. अशात दोघांनाही लग्न करण्याची इच्छा होती. ज्यानंतर दोन्ही पक्षांनी आपली सहमती दिली होती. ज्यानुसार त्यांचा निकाह लावून देण्यात आला.
 

Web Title: Bride mother beat up the groom at the time of marriage in hardoi UPP