बोंबला! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीने मागितला घटस्फोट, कारण वाचून हैराण झाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 10:11 IST2023-08-18T10:10:26+5:302023-08-18T10:11:00+5:30

पोस्टमध्ये महिलेने सांगितलं की, सुरूवातीला लग्न करण्यात कोणताही इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिला 2020 मध्ये प्रपोज केलं तेव्हा तिने होकार दिला.

Bride asks for divorce a day after wedding due to groom prank ever after warning | बोंबला! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीने मागितला घटस्फोट, कारण वाचून हैराण झाले लोक

बोंबला! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीने मागितला घटस्फोट, कारण वाचून हैराण झाले लोक

एका महिलेने लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये महिलेने हे मान्य केलं की, तिने इशारा दिल्यावरही लग्नात तिच्या पतीने असं काही केलं की, तिला हा निर्णय घ्यावा लागला. स्लेटच्या डिअर प्रूडेंस कॉलममध्ये सबमिट करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नाव न देता, महिलेने सांगितलं की, लवकर तिचा घटस्फोट होईल.

पोस्टमध्ये महिलेने सांगितलं की, सुरूवातीला लग्न करण्यात कोणताही इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिला 2020 मध्ये प्रपोज केलं तेव्हा तिने होकार दिला. दोघांनी लग्नाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. कोणताही वाद नव्हता.

महिलेने सांगितलं की, माझी फक्त एक अट होती की, लग्नाच्या दिवशी खासकरून माझ्या पतीने माझ्या चेहऱ्यावर केक लावू नये. मला विश्वास होता की, मला जर चांगल्या प्रकारे ओळखत असेल तर अशी चूक करणार नाही. पण त्याने लग्नादरम्यान माझी मान पकडून माझा चेहरा केकमध्ये टाकला. 

महिलेने सांगितलं की, हे सगळं त्याने प्लान करून केलं होतं. कारण त्याच्याकडे आणखी एक केक होता. हे मला अजिबात आवडलं नाही आणि मी दुसऱ्या दिवशीच त्याला सांगितलं की, बस खूप झालं हा लग्नाचा शेवट आहे. ती म्हणाली की, माझ्या परिवाराला वाटतं की, मी पतीला माफ करावं आणि त्याला एक संधी द्यावी. 

तिने पुढे लिहिलं की, माझ्या पतीला हे समजायला हवं होतं की, एका कार अपघातानंतर मी claustrophobic आहे आणि अशा गोष्टींमुळे घाबरते. महिलेने लोकांना विचारलं की, काय तिने तिच्या पतीला माफ करावं. पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या. एकाने लिहिलं की, महिलेने तिच्या पतीपासून वेगळं व्हावं. तर दुसऱ्याने लिहिलं की, इतक्या छोट्या गोष्टीसाठी आयुष्य बर्बाद करू नको.

Web Title: Bride asks for divorce a day after wedding due to groom prank ever after warning