पुरूषांना कंटाळून मॉडलने स्वत:शीच केलं लग्न, ३ कोटीची ऑफर देत शेख म्हणाला - माझ्याशी लग्न कर....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:09 PM2021-09-24T15:09:37+5:302021-09-24T15:11:14+5:30

तिने सांगितलं की, जेव्हा तिच्या लग्नाची बातमी व्हायरल झाली.  तेव्हा तिला अनेक तरूणांचे मेसेज आले. त्यांना तिच्यासोबत लग्न करायचं होतं.

Brazil model married herself arab sheikh offered 3 crore to take divorce and marry him | पुरूषांना कंटाळून मॉडलने स्वत:शीच केलं लग्न, ३ कोटीची ऑफर देत शेख म्हणाला - माझ्याशी लग्न कर....

पुरूषांना कंटाळून मॉडलने स्वत:शीच केलं लग्न, ३ कोटीची ऑफर देत शेख म्हणाला - माझ्याशी लग्न कर....

Next

कधी कधी दोन व्यक्तींमद्ये सगळं काही मनासारखं होत नसतं. रिलेशनशिपमध्ये राहताना लोक आपल्या पार्टनरसोबत लॉयल राहू शकत नाहीत. ज्यामुळे ते पार्टनरला दगा देतात. अशात ज्यांना दगा मिळतो त्यांचा प्रेमावरून विश्वास उडतो. असंच काहीसं एका ब्राझीलियन मॉडलसोबत झालं. जी पुरूषांनी दिलेल्या दग्यांना कंटाळून एकटी राहू लागली. नंतर तिच्या लक्षात आलं की, एकटं राहणं शक्य आहे. तिला कुणाचीही गरज नाही. तेव्हा या महिलेने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला.

मॉडलने स्वत:शीच केलं लग्न

ब्राझीलच्या साओ  पाओलोची ३३ वर्षीय  मॉडल क्रिस गॅलराच्या जीवनात एक असं वळणं आलं जेव्हा ती तिच्या जुन्या बॉयफ्रेन्डला कंटाळून एकटी राहू लागली होती. त्यावेळी तिला फार एकटेपणा जाणवत होता आणि तिला वाटत होतं की, आनंदी राहण्यासाठी तिला एका पार्टनरची गरज आहे. पण तिने स्वत:ला सांभाळलं आणि निर्णय घेतला की, ती स्वत:शीच लग्न करेल. कारण तिला कुणाची गरज नाही. (हे पण वाचा : गॅसची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती महिला, डॉक्टरांनी दिली ८ महिन्यांची प्रेग्नेंट असल्याची न्यूज)

क्रिसने स्वत:च चर्चमद्ये जाऊन स्वत:शीच लग्न केलं. सोशल मीडियावर तिचे लग्नाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. क्रिसचे बोल्ड फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. पण लग्नानंतर क्रिसने डेली स्टारसोबत बोलताना आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

अरब शेखने दिली ३ कोटी रूपयांची ऑफऱ

तिने सांगितलं की, जेव्हा तिच्या लग्नाची बातमी व्हायरल झाली.  तेव्हा तिला अनेक तरूणांचे मेसेज आले. त्यांना तिच्यासोबत लग्न करायचं होतं. यातील एक मेसेज एका अरब शेखचा होता. मॉडलने सांगितलं की, अरब शेख तिला म्हणाला की, तिने स्वत:ला घटस्फोट द्यावा आणि त्याच्यासोबत लग्न करावं. याबदल्यात त्याने तिला ३ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम हुंडा म्हणून ऑफर  केली. मॉडलने शेखला उत्तर दिलं की, ती विक्री नाही आणि ती त्या व्यक्तीला ओळखत नाही. त्यामुळे ती केवळ पैशांसाठी त्याच्यासोबत लग्न करणार नाही. 
 

Web Title: Brazil model married herself arab sheikh offered 3 crore to take divorce and marry him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app