गॅसची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती महिला, डॉक्टरांनी दिली ८ महिन्यांची प्रेग्नेंट असल्याची न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 11:52 AM2021-09-24T11:52:13+5:302021-09-24T11:55:26+5:30

रिवोनी म्हणाली की, 'एकदा पुन्हा मला असं झाल्याने मी डॉक्टरांना भेटून औषध घेण्याचा निर्णय घेतला. चेकअपनंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून मी पूर्णपणे शॉक झाली.

Severe indigestion pregnancy diagnosis medication woman surprised | गॅसची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती महिला, डॉक्टरांनी दिली ८ महिन्यांची प्रेग्नेंट असल्याची न्यूज

गॅसची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती महिला, डॉक्टरांनी दिली ८ महिन्यांची प्रेग्नेंट असल्याची न्यूज

Next

जगात कुणासोबतही कोणतीही अजब घटना घडू शकते. असंच काहीसं UK तील रिवोनी एडम्ससोबत झालं. 'द सन' च्या रिपोर्टनुसार, २२ वर्षीय रिवोनीला नेहमीच पोटात गॅसची समस्या राहत होती आणि गेल्या तीन वर्षात तर ती पचनासंबंधी समस्येची औषधंही घेत होती. रिवोनी म्हणाली की, 'मी जेव्हाही तिखट पदार्थ खाते किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स पिते तेव्हा मला मळमळ होते. पोटावर सूज येते आणि पोट दुखू लागतं. मला भूक लागणंही बंद होतं'.

रिवोनी म्हणाली की, 'एकदा पुन्हा मला असं झाल्याने मी डॉक्टरांना भेटून औषध घेण्याचा निर्णय घेतला. चेकअपनंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून मी पूर्णपणे शॉक झाली.  मी माझ्या लक्षणांबाबत डॉक्टरांना सांगणार होते तेव्हा ते म्हणाले की, मी प्रेग्नेंट आहे. इतकंच नाही तर ते म्हणाले की, मी ८ महिन्यांची प्रेग्नेंट आहे आणि माझी डिलेव्हरी कधीही होऊ शकते. एक मिनिट तर माझ्या लक्षातच आलं नाही की, ते काय म्हणत आहेत. मी डॉक्टरांसोबत वाद घालणं सुरू केलं. कारण माझ्यात प्रेग्नेन्सीची काहीच लक्षणे नव्हती'. (हे पण वाचा : 'मॅडम, पत्नी आंघोळच करत नाही, घटस्फोट हवा' काउन्सेलरकडे मागणी, पारोस्या पत्नीमुळं पती झाला हैराण)

रिवोनी आणि तिचा पार्टनर फिटनेस फ्रीक आहे. ते जिममध्ये बराच वेळ असतात. रिवोनी म्हणाली की, 'प्रेग्नेन्सीची बाब मला पूर्णपणे अशक्य वाटत होती. कारण माझी पाळी मिस झाली नव्हती आणि एब्स पूर्णपणे परफेक्ट होते. ना मला कधी त्रास झाला ना मॉर्निंग सिकनेस झालं. इतकंच काय तर माझं वजनही वाढलं नाही आणि माझं पोटही बाहेर आलं नाही. त्यामुळे मी डॉक्टरांसोबत वाद घातला. मी माझ्या पार्टनरकडे पाहिलं तर तो गपचूप उभा होता'.

रिवोनी म्हणाली की, 'प्रेग्नेन्सीबाबत ऐकून मी आनंदी झाले होते. पण मला माझ्या अपेक्षा विनाकारण वाढवायच्या नव्हत्या. मला हेच वाटत होते की, चेकअप करण्यात डॉक्टरांची काहीतरी चूक झाली असेल. रस्त्यात मी आणि माझा पार्टनर गप्प होतो. मग अचानक हसत तो म्हणाला की, आता मला लक्षात आलं की काही दिवसांपासून का तुला जास्त चटपटीत खायची इच्छा होत आहे'. रिवोनी तिच्या पार्टनरसोबत २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. (हे पण वाचा : काय सांगता! महिलेने जुळ्या बाळांना दिला जन्म, पण दोघांचेही वडील निघाले वेगवेगळे)

रिवोनी म्हणाली की, 'मला हे मान्यच होत नव्हतं की, मी ८ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. तुम्ही कल्पना करा की, तुम्ही डॉक्टरकडे गॅसच्या समस्येसाठी जाता आणि ते तुम्हाला सांगतात की, तुम्ही बाळाला जन्म देणार आहात. आता जेव्हापासून मला प्रेग्नेन्सीबाबत समजलं तेव्हापासून मला काही लक्षणे जाणवत आहेत. डिलीव्हरीत आता काही आठवडेच शिल्लक राहिले आहेत आणि माझं पोटही बाहेर येत आहे'. 

रिवोनी म्हणाली की, 'करिअर, आर्थिक आणि आरोग्य या तिन्ही प्रकारे आम्ही कोणत्याही जबाबदारीसाठी तयार नव्हतो. आम्हाला आमच्या रिलेशनशिपलाही आणखी वेळ द्यायचा होता. हे सत्य  स्वीकारण्यात मला जरा वेळ लागला. पण आता मी माझ्या प्रेग्नन्सीबाबत उत्साही आहे. मी माझ्या बाळाला भेटण्यासाठी आतुर आहे'.
 

 

Web Title: Severe indigestion pregnancy diagnosis medication woman surprised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.