गर्लफ्रेंडशी भांडण होताच 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं; 40 कोटींचं सामान उद्ध्वस्त केलं, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 15:18 IST2022-06-06T15:11:59+5:302022-06-06T15:18:29+5:30

तरुणाने 40 कोटींचं नुकसान केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तरुणाने स्वत:च पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली आहे.

boy destroys 40 crores rs ancient art after fight with girlfriend | गर्लफ्रेंडशी भांडण होताच 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं; 40 कोटींचं सामान उद्ध्वस्त केलं, काय घडलं?

गर्लफ्रेंडशी भांडण होताच 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं; 40 कोटींचं सामान उद्ध्वस्त केलं, काय घडलं?

कपलमध्ये नेहमीच छोट्या छोट्य़ा गोष्टींवर वाद होत असतात. काही वाद हे टोकाला देखील जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गर्लफ्रेंडशी भांडण होताच एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. तब्बल 40 कोटींचं सामान उद्ध्वस्त केलं. या घटनेमुळे सर्वच हैराण झाले आहेत. तरुणाने 40 कोटींचं नुकसान केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तरुणाने स्वत:च पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेच्या Dallas शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

ब्रायन हर्नांडेज असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून त्याचं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं. त्यानंतर त्याने एक म्युझियममध्ये घुसून तोडफोड करण्यास सुरुवात केली. ब्रायनने म्युझियममध्ये ठेवलेली तब्बल 5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 40 कोटींची प्राचीन ग्रीक कलाकृती तोडली आहे. माझं गर्लफ्रेंडसोबत भांडण झाल्यामुळे मी अनमोल कलाकृती नष्ट केली असं ब्रायनने पोलिसांना फोन करून सांगितलं आहे. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ब्रायनने म्युझियममध्ये घुसून तीन प्राचीन यूनानी कलाक़ृती नष्ट केल्या. ज्या जवळपास 2500 वर्षे जुन्या होत्या. त्याची किंमत जवळपास 40 कोटी आहे. म्युझियमचा दरवाजा तोडून तो आत शिरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही  फुटेजमध्ये ब्रायन एका स्टूलच्या मदतीने प्राचीन कलाकृती तोडताना दिसत आहेत. म्युझियमच्या गार्डने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने कोणाचच काहीच ऐकलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Web Title: boy destroys 40 crores rs ancient art after fight with girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.