शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग...

By बाळकृष्ण परब | Published: February 25, 2021 10:40 AM

employee plotted his own abduction : ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की तुम्ही काय कराल? शक्यतो आपल्या वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. पण...

वॉशिंग्टन - ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की तुम्ही काय कराल? शक्यतो आपल्या वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. (Office Work) पण अमेरिकेतील अ‍ॅरिझोनामधील कूलिजमध्ये एका १९ वर्षीय कर्मचाऱ्याने सुट्टी घेण्यासाठी जे काही केले त्याबाबत वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (Since the boss was not on leave, the employee plotted his own abduction)१९ वर्षीय ब्रेंडन सुल्स याने कामावरून सुट्टी मिळवण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचे कारस्थान रचल्याचे समोर येत आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार १९ वर्षांच्या ब्रँडन सूल्स यांनी कामावरून सुट्टी मिळवण्यासाठी आपल्याच अपहरणाचे कारस्थान रचल्याची शंका व्यक्त ककण्याच येत आहे. पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार ब्रँडन सूल्स हा एका टायरच्या कारखान्यात काम करत होता. तो एका पाण्याच्या टाकीजवळ दिसून आला. त्याचे हात बांधले गेलेले होते आणि त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता. त्याला तिथून जाणाऱ्या एका वाटसरूने पाहिले.त्याने पोलिसांना सांगितले की, त्याचे अपहरण दोन जणांनी केले होते. त्यांनीमला बेशुद्ध केले आणि पाण्याच्या टाकीतून बाहेर पडण्यापूर्वी मला एका वाहनात कोंबले. त्यांनी माझे अपहरण केले होते. कारण माझ्या वडलांनी शहरातील चारी बाजूंना पैसे लपवून ठेवले होते, असा दावा सुल्स याने केला.मात्र नंतर कुलिजच्या गुप्तहेरांनी केलेल्या तपासामध्ये त्यांना अपहरणाचा कुठलाच पुरावा दिसून आला नाही. सुल्स सांगत असलेल्या कहाणीची पडताळणी करण्यासाठी व्हिडीओ पाहण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते सर्व काही खरे नसल्याचे दिसून आले.दरम्यान, सुल्सने अखेरीच पोलिसांसमोर आपण सुट्टी घेण्यासाठी अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली. त्यानंतर चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली.एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेची माहिती देताना सुल्स म्हणाला की, सर्वप्रथम मी माझ्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर बेल्ट उतरवून बेल्टने माझे हात बांधून घेतले. त्यानंतर मी रस्त्याच्या कडेला कुणालाही सहजपणे दिसून येईल, अशा ठिकाणी झोपलो.

टॅग्स :Employeeकर्मचारीKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके