Video : अजगराच्या तावडीत असं काही सापडलं मांजर, बघा पुढे काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 16:36 IST2020-03-05T16:31:36+5:302020-03-05T16:36:45+5:30
अजगरचा आणि रान मांजराचा हा व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवणारा आहे.

Video : अजगराच्या तावडीत असं काही सापडलं मांजर, बघा पुढे काय झालं...
आतापर्यंत अजगराचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण हा अजगरचा आणि रान मांजराचा हा व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवणारा आहे. या व्हिडीओत एका अजगराच्या जाळ्यात अडकलेलं रानमांजर सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि हा अजगर खूप मोठा आहे. या अजगराने मांजराला संपूर्ण गुंडाळले आहे. रस्त्याच्या मधोमध हा प्रकार घडत आहे. व्हिडीओ नेमका कुठला आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हा व्हिडिओ अर्जेटिनाचा आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे. ट्विटवर हा व्हिडीओ वनविभागात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने शेअर केला आहे. त्यांच नाव रोजस असं आहे. रोजस यांनी सांगितले की या अजगराच्या तावडीतून मांजराची सुटका करण्यासाठी स्थानिकांना यश आलं आहे. ( हे पण वााचा-अबब! विद्यार्थ्याच्या तोंडातून काढला जगातील सर्वात मोठा दात; लांबी पाहून डॉक्टरही झाले चकीत)
हे खूप जोखिमीचं आहे पण तेथिल स्थानिक लोकांना अजगर आणि वन्य प्राण्यांची कशी सुटका करायची याबाबत माहिती आहे. ( हे पण वाचा-मुलाच्या बर्थ डे ला दारू ढोसून बापाचा मोठा कारनामा, सकाळी काही आठवतही नव्हतं!)