बाबो! भाच्यावर फिदा झाली मामी, संधी मिळताच पळून गेले अन् उरकून टाकलं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 17:44 IST2021-07-02T17:40:49+5:302021-07-02T17:44:20+5:30
मामाच्या लग्नानंतर रतनपूर साह टोला येथे राहणारा भाचा चंदन साह आपल्या आजोळी मननपूर येत-जात होता.

बाबो! भाच्यावर फिदा झाली मामी, संधी मिळताच पळून गेले अन् उरकून टाकलं लग्न!
पवित्र नात्यांना काळिमा फासणाऱ्या अनेक घटना अलिकडे सतत समोर येत आहेत. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यात एक मामी तिच्या भाच्याच्या प्रेमात पडली. प्रेम इतकं की, दोघांनी पळून जाऊ लग्न केलं.
जमुई जिल्ह्याच्या गिद्धौर प्रखंड भागातील रतनपूर साह टोलामध्ये ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी मामी लग्न करून मामाच्या घरात आली होती. त्यानंतर ती भाच्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी पळून जाऊ लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मामी-भाच्याचा लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखसरायच्या चानन प्रखंड अंतर्गत मननपूर गावात राहणाऱ्या तरूणाचं लग्न डुमरडोह गावात राहणाऱ्या तरूणीसोबत झालं होतं. (हे पण वाचा : पती ऑफिसमध्ये सेक्रेटरीसोबत करत होता मजा, इतक्यात पत्नी सरप्राइज देण्यासाठी आली आणि मग....)
मामाच्या लग्नानंतर रतनपूर साह टोला येथे राहणारा भाचा चंदन साह आपल्या आजोळी मननपूर येत-जात होता. यादरम्यान मामीच्या नजरेशी त्याची नजर भिडली. दोघांमध्ये जवळीकता वाढली.. दोघे प्रेमात इतके हरवले की दोघांनी आपलं मामी-भाच्याचं नातं विसरून एक होण्याचा निर्णय घेतला. संधी मिळताच दोघेही फरार झाले आणि लग्नही केलं.