विमानात कधी भिकारी पाहिलाय?... पण, पाकिस्तानात काहीही होऊ शकतं राव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 11:35 IST2018-06-21T11:25:08+5:302018-06-21T11:35:33+5:30

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

A beggar begging on a Karachi Bangkok Flight Video Goes Viral | विमानात कधी भिकारी पाहिलाय?... पण, पाकिस्तानात काहीही होऊ शकतं राव!

विमानात कधी भिकारी पाहिलाय?... पण, पाकिस्तानात काहीही होऊ शकतं राव!

मुंबई : तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना भिकारी पाहिले असतील. मात्र विमान प्रवासात तुम्ही कधी भिकारी पाहिलाय का? विमानात भिकारी कसा काय येईल? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र असं घडलं आहे. कराचीवरुन बँकाँगला जाणाऱ्या विमानात चक्क भिकारी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

कराचीहून बँकाँगला जाणाऱ्या विमानात भिकारी शिरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. हा भिकारी पाकिस्तानचा नागरिक होता, अशीही माहिती पुढे आली. यानंतर पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयानं स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावला. मात्र या दाव्यावर विश्वास ठेवायला अनेकजण तयार नाहीत. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीनं हा भिकारी इराणचा असल्याचं वृत्त दिलं. 



सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक भिकारी विमानातील आसनांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उभा असल्याचं दिसत आहे. विमानातील कर्मचारी या भिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.  मात्र त्याचा कोणताही परिणाम भिकाऱ्यावर होताना दिसत नाही. या भिकाऱ्याचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. हा भिकारी विमानतळावर कसा पोहोचला, तिथून तो विमानात कसा गेला, याची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. 

Web Title: A beggar begging on a Karachi Bangkok Flight Video Goes Viral