प्रेम आंधळ असतं यावर बसेल तुमचा ठाम विश्वास! फक्त हा व्हिडिओ तर पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 18:52 IST2021-08-10T18:07:52+5:302021-08-10T18:52:04+5:30
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अनेकांना पचनी पडताना दिसत नाहीय. व्हिडीओत एक सुंदर मुलगी एका तरुणाला किस (kiss) करतेय...आता यामध्ये पचनी न पडण्यासारखं काय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर त्यामागे एक खास कारण आहे.

प्रेम आंधळ असतं यावर बसेल तुमचा ठाम विश्वास! फक्त हा व्हिडिओ तर पाहा
सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल (viral video) होईल याचा भरोसा नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अनेकांना पचनी पडताना दिसत नाहीय. व्हिडीओत एक सुंदर मुलगी एका तरुणाला किस (kiss) करतेय...आता यामध्ये पचनी न पडण्यासारखं काय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर त्यामागे एक खास कारण आहे. (girl kissing guy with big tooth)
व्हिडीओत एक सुंदर मुलगी टेबलवर बसली आहे. नंतर दिसतो तो बाजूला बसलेला तरुण आणि त्याचे मोठमोठे दात. दोघांच्या हातात ज्युसचा ग्लास आहे. तो तरुण कॅमेऱ्यात बघतो, तेव्हा त्याचे मोठे दातं स्पष्टपणे दिसतात. नंतर जसजसा कॅमेरा क्लोज जातो तसं ती मुलगी त्या तरुणाला किस करते. मुलीचं प्रेम बघुन मुलगाही खूश होतो. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा झुम होतो आणि तुम्ही पाहु शकता तो कसा दिसतो ते?
व्हिडीओवर नेटीझन्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या दुनियेत कधी काय होईल, याचा भरोसा नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने देवा सिंगल पोरांवर एवढा अन्याय का? अशी कमेंट केलीय. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ giedde नावाच्या युजर आयडीवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडत आहे.