गर्लफ्रेेंडसोबत कारमध्ये डोसा खात होता पती; तितक्यात पत्नीनं रंगेहात पकडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 14:49 IST2021-01-20T14:36:52+5:302021-01-20T14:49:20+5:30

पत्नीने त्याला हा कारनामा करताना रंगेहाथ पकडलं आणि त्याची गच्चांडी धरून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली. पत्नीने पतीची पोलिसात तक्रार दिली आहे. 

UP Banda girlfriend eating fast food hiding from wife caught police station complaint | गर्लफ्रेेंडसोबत कारमध्ये डोसा खात होता पती; तितक्यात पत्नीनं रंगेहात पकडलं अन्...

गर्लफ्रेेंडसोबत कारमध्ये डोसा खात होता पती; तितक्यात पत्नीनं रंगेहात पकडलं अन्...

(Image Credit : meetmindful.com)(प्रतिकात्मक छायाचित्र)

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. इथे एका विवाहित व्यक्तीला त्याच्या गर्लफ्रेन्डला डोसा खायला घेऊन जाणं चांगलंच महागात पडलं. पत्नीने त्याला हा कारनामा करताना रंगेहाथ पकडलं आणि त्याची गच्चांडी धरून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली. पत्नीने पतीची पोलिसात तक्रार दिली आहे. 

ही घटना मंगळवार सायंकाळची आहे. बांदा येथील राजकीय निर्माण निगममधील आरोपी ज्यूनिअर इंजिनिअर आनंद विश्वकर्मा आपल्या गर्लफ्रेन्डला हनुमान मंदिराजवळ डोसा खाण्यास घेऊन गेला होता. ज्यूनिअर इंजिनिअरने कारमध्ये व्यवस्थित बसून डोसा खाण्याचा प्लॅन केला होता. पण त्याच्या या प्लॅनवर त्याच्या पत्नीने पाणी फेरलं. (विवाहित महिलेसोबत परपुरुषाचे राहणे म्हणजे लिव्ह इन नाही, तो गुन्हा : उच्च न्यायालय)

(Image Credit : YouTube)

मीडिया रिपोर्टनुसार ज्यूनिअर इंजिनिअर प्लेटमध्ये डोसा घेऊन कार बसणार इतक्यात त्याची पत्नी तिथे आली. ती एकटी नाही तर भावालाही सोबत घेऊन आली. पत्नी पतीला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत कारममध्ये रंगेहाथ पकडलं. ज्यूनिअर इंजिनिअरच्या पत्नीने तिथेच गोंधळ घातला. वाद इतका वाढला की, दोघांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.

पत्नी यावेळी म्हणाली की, तिला पतीच्या रंगेलपणाबाबत चांगलंच माहीत आहे. तिच्या ज्यूनिअर इंजिनिअर पतीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. ज्यासाठी तो अनेक शहरांमध्ये फिरत राहतो. आता सगळा भांडाफोड झाल्यामुळे बिथरलेल्या पतीने यावर काहीही समाधानकारक उत्तर दिलं नाही. पण तो स्वत:ला निर्दोष सांगत राहिला.

इकडे भडकलेल्या पत्नीने पती विरोधात पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवर काही कारवाई करण्याऐवजी ही घटना सामान्य वाद मानत आरोपी ज्यूनिअर इंजिनिअरला इशारा देऊन सोडून दिलं.
 

Web Title: UP Banda girlfriend eating fast food hiding from wife caught police station complaint