इराणमध्ये मुलींचं लग्न कोणत्या वयात होतं? भारतात १८ वर्षे तर तिथे फारच वेगळा आहे नियम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:19 IST2026-04-07T12:17:04+5:302026-04-07T12:19:28+5:30

Iran Marriage Age : भारतात मुलींच्या लग्नाचं कायदेशीर वय हे १८ वर्षे असतं, तेच इराणच्या कायद्याने हे वय फारच कमी ठेवलंय. पाहुयात इराणमधील लग्नाचा कायदा कसा आहे.

At what age do girls get married in Iran? Know their rules | इराणमध्ये मुलींचं लग्न कोणत्या वयात होतं? भारतात १८ वर्षे तर तिथे फारच वेगळा आहे नियम...

इराणमध्ये मुलींचं लग्न कोणत्या वयात होतं? भारतात १८ वर्षे तर तिथे फारच वेगळा आहे नियम...

Iran Marriage Age : इराण विरोधात अमेरिका आणि इस्त्राइलने पुकारलेल्या युद्धामुळे अजूनही तणावाचं वातावरण आहे. जगभराचं लक्ष या युद्धाकडे लागलंय. जगातील अनेक देशांवर याचा वेगवेगळा प्रभाव पडतोय. दरम्यान लोकांना इराणबाबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता वाढलीये. लोकांना येथील लग्नाच्या कायद्याबाबत प्रश्न पडलेत. भारतात मुलींच्या लग्नाचं कायदेशीर वय हे १८ वर्षे असतं, तेच इराणच्या कायद्याने हे वय फारच कमी ठेवलंय. पाहुयात इराणमधील लग्नाचा कायदा कसा आहे.

इराणमधील लग्नाचं कायदेशीर वय किती?

इराणच्या सिव्हिल कोड अनुच्छेद १०४१ नुसार मुली कायदेशीरपणे १३ वर्षाच्या झाल्यावर लग्न करू शकतात. तर मुलांसाठी हे वय १५ वर्षे इतकं आहे. ही इराणमध्ये लग्नासाठी अधिकृत वय आहे. पण कायद्याने यात काही सूटही दिली आहे. म्हणजे जर एखादा पिता किंवा आजोबाच्या सहमतीने आणि कोर्टाच्या मंजूरीनंतर यापेक्षाही कमी वयात लग्न केलं जाऊ शकतं. 

१३ पेक्षा कमी वयात लग्न

काही केसेसमध्ये १३ पेक्षा कमी वयात लग्नाची परवानगी तेव्हा दिली जेव्हा एखादे न्यायाधीश याला मंजूरी देतील. इराणच्या कायद्यानुसार मुली ९ चंद्र वर्षात कायदेशीरपणे सज्ञान, वयस्क मानल्या जातात. ९ चंद्र वर्ष म्हणजे जवळपास ८ वर्ष आणि ९ महिने. पण यावरून इराणमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद आहेत.

कमी वयात किती लग्ने होतात?

काही रिपोर्ट्सनुसार, इराणमध्ये दरवर्षी १५ पेक्षा कमी वयाच्या हजारो मुलींची लग्ने होतात. जवळपास १७ टक्के मुलींचं लग्न त्यांचं वय १८ होण्याआधी होतं आणि जवळपास ३ टक्के लग्ने १५ वयाच्या आतच होतात. मात्र, शहरी भागांमध्ये एक बदल खास बदल बघायला मिळतो. शिक्षण आणि सामाजिक बदलांमुळे मुलींच्या लग्नाचं वय सरासरी वाढलं आहे. कायद्याची सीमा कमी असली तरीही इराणमध्ये लग्न उशिरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आकडेवारीनुसार महिला जवळपास २५ वयात लग्न करत आहेत आणि पुरूष २९ ते ३० वयात लग्न करत आहेत.

विवाहित महिलांवर प्रभाव टाकणारे दुसरे कायदे

इराणमध्ये लग्नाचे कायदे लग्नानंतरही महिलांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या ठरवतात. त्यांना काही कामांसाठी पतीची परवानगी घ्यावी लागते. जसे की, पासपोर्ट काढणे किंवा परदेश प्रवास करणे. त्याशिवाय घटस्फोट आणि निर्णय घेण्याबाबत पुरूषांना अधिक अधिकार असतात. तर महिलांना अशा अधिकारांचा वापर करण्यासाठी अनेकदा कठोर नियमांचा सामना करावा लागतो.

Web Title : ईरान में शादी की उम्र: भारत से अलग नियम और कानून

Web Summary : ईरान में लड़कियां कानूनी तौर पर 13 साल की उम्र में शादी कर सकती हैं, लेकिन माता-पिता और अदालत की सहमति से यह उम्र और भी कम हो सकती है। कई लोग 18 साल से पहले शादी कर लेते हैं, हालांकि शहरी क्षेत्रों में बाद में शादियां होती हैं। कानून शादी के बाद महिलाओं के अधिकारों को भी प्रभावित करते हैं।

Web Title : Iran Marriage Age: Legal Age and Laws Compared to India

Web Summary : In Iran, girls can legally marry at 13, but with parental and court consent, it can be younger. Many marry before 18, though urban areas see later marriages. Laws also impact women's rights post-marriage.