'या' चित्रात लपला आहे एक प्राणी; शोधा पाहू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:17 IST2020-02-13T12:58:41+5:302020-02-13T13:17:27+5:30
फोटोमध्ये एका गावाकडील भागातले सुकलेलं गवत दिसून येत आहे.

'या' चित्रात लपला आहे एक प्राणी; शोधा पाहू
बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही. सध्या सोशल मीडियावरही असाचं एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये देखील एक प्राणी लपला आहे.
या फोटोमध्ये एका गावाकडील भागातले सुकलेलं गवत दिसून येत आहे. मात्र या फोटोला तुम्ही नीट काळजीपूर्वक बघितला तर एक प्राणी बसलेला असल्याचे दिसून येईल.
फोटोमध्ये आपल्याला सुकलेल्या गवताच्या बाजूला दगड दिसत आहे. या दगडाच्या खालच्या बाजूला नीट बघितल्यानंतर एक मांजर बसली असल्याचे दिसून येत आहे.