जमिनीखालून निघाला 2 हजार वर्ष जुना पितळेचा हात, समोर आले अनेक रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:09 AM2024-02-28T11:09:26+5:302024-02-28T11:11:08+5:30

यात सगळ्यात जास्त आश्चर्यकारक बाब म्हणजे या हातावर अनेक चिन्ह आहेत. हातावर सगळ्यात वर दिसलं की, चिन्हांच्या चार लाईन आहेत.

Ancient bronze hand unearth in Spain could unlock secrets of language archaeologists | जमिनीखालून निघाला 2 हजार वर्ष जुना पितळेचा हात, समोर आले अनेक रहस्य

जमिनीखालून निघाला 2 हजार वर्ष जुना पितळेचा हात, समोर आले अनेक रहस्य

जगातील वेगवेगळ्या देशांमधील प्राचीन शहरांमध्ये शोधासाठी खोदकाम सुरू असतं. यातून प्राचीन काळ आणि इतिहासाबाबत बरंच काही जाणून घेता येतं. कारण खोदकामातून मिळणाऱ्या गोष्टी सांगतात की, त्यावेळी लोक कसे राहत होते. असंच काहीसं स्पेनमध्ये झालं. इथे जमिनीखाली एक पितळेचा हात सापडला. जो 2 हजार वर्ष जुना असल्याचं सांगण्यात येत आहे.

यात सगळ्यात जास्त आश्चर्यकारक बाब म्हणजे या हातावर अनेक चिन्ह आहेत. हातावर सगळ्यात वर दिसलं की, चिन्हांच्या चार लाईन आहेत. एका नव्या शोधातून समजलं की, हे चिन्ह प्राचीन पॅलियोहिस्पैनिक भाषेत असू शकतात. असं होऊ शकतं की, हे चिन्ह त्या भाषेचा भाग असतील. जी प्राचीन काळात स्पेनच्या बास्कमध्ये विकसित झाली होती. हात त्याच भागात सापडला. जिथे वास्कोन्स जमातीचे लोक राहत होते.

या जमातीबाबत ज्या गोष्टी समजल्या त्यानुसार ही जमात शिकलेली होती. कारण अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत ज्यांवर अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता या पितळेच्या हातामुळे या जमातीच्या भाषेचे रहस्य उलगडू शकतात. या हातावर एक छिद्रही आहे. ज्याबाबत अभ्यासकांचं मत आहे की, याचा वापर घराच्या प्रवेश द्वारावर टांगण्यासाठी केला जात असावा.

हातावर लिहिण्यात आलेल्या गोष्टी अजून पूर्ण ट्रांसलेट करण्यात आलेल्या नाहीत. यावर शब्द sorieneku सुद्धा लिहिण्यात आला आहे. ज्याचा अर्थ शुभ असा होतो. अभ्यासक या हाताच्या माध्यमातून अनेक रहस्य उलगडतील अशी आशा करत आहेत. वास्कोनिक आणि इरेबिअन भागांमध्ये अनेक प्राचीन कलाकृती सापडल्या आहेत. अभ्यासकांचं मत आहे की, हा हात त्याच स्थानावर बनवण्यात आला होतो, जिथे तो सापडला. कारण या भागात पितळ एक कॉमन वस्तू आहे. 

Web Title: Ancient bronze hand unearth in Spain could unlock secrets of language archaeologists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.