सापाला पळवण्यासाठी लावली आग, काही मिनीटातच आग भडकली अन् 13 कोटींच्या घराचा झाला कोळसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:19 IST2021-12-06T18:54:59+5:302021-12-06T19:19:38+5:30

अमेरिकेतील एका व्यक्तीने घरातील सापांना पळवण्यासाठी घरात आग लावली, पण यावेळी त्याचे आलीशान घर जळून गेले.

America News; a home was accidentally burned by its owner who was trying to get rid of a snakes | सापाला पळवण्यासाठी लावली आग, काही मिनीटातच आग भडकली अन् 13 कोटींच्या घराचा झाला कोळसा

सापाला पळवण्यासाठी लावली आग, काही मिनीटातच आग भडकली अन् 13 कोटींच्या घराचा झाला कोळसा


तुम्ही अनेकदा घरात किंवा घराच्या आसपास साप दिसल्याच्या घटनांबद्दल वाचले असेल. पण, घरात निघालेल्या सापाला पळवून लावण्यासाठी एखाद्याने आपले घरच पेटवून दिले तर ? ऐकून विचित्र वाटत असेल, पण अशी घटना घडली आहे. घरात निघालेल्या सापाला पळवण्यासाठी एका माणसाने आग लावली, पण काही मिनीटातच ही आग घरभर पसरली आणि तब्बल 13 कोटी रुपयांच्या घराचा अक्षरशः कोळसा झाला. 

ही विचित्र घटना अमेरिकेतील माउंटगोमेरी काउंटी, मेरीलँड येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका व्यक्तीच्या घरात अनेकदा साप निघत होते. या सापांना हकलण्याचा त्याने अनेकदा प्रयत्न केला. त्याला एक युक्ती सूचली, सापाला हकलून लावण्यासाठी त्याने धुराचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

त्याने घरात आग लावून धूर केला, पण यादरम्यान घरातील ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकली. पाहता-पाहता ही आग घरभर पसरली आणि अख्ख घर जळून गेलं. माउंटगोमेरी काउंटी फायर अँड रेस्क्यू सर्व्हिसचे मुख्य प्रवक्ते पीट पिरिंगर यांनी सीएनएनला सांगितल्यानुसार, जळालेल्या घराची किंमत $1.8 मिलीयन(13 कोटी रुपये)होती. पीट यांनी या घराला लागलेल्या आगीचे तसेच घराचे जळालेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पण, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. 

Web Title: America News; a home was accidentally burned by its owner who was trying to get rid of a snakes