सुंदर पिचाई यांना यावर्षी मिळणारा परफॉर्मन्स बोनस पाहून चक्रवाल, तुम्हाला किती मिळतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 14:31 IST2019-12-24T14:29:28+5:302019-12-24T14:31:46+5:30
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने सुंदर पिचाई यांना काही नवीन टार्गेट दिले आहेत.

सुंदर पिचाई यांना यावर्षी मिळणारा परफॉर्मन्स बोनस पाहून चक्रवाल, तुम्हाला किती मिळतो?
आधी गुगल आणि नंतर त्यांची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई यांनी जर त्यांचे सगळे टार्गेट पूर्ण केले, तर त्यांना तीन वर्षांपर्यंत अवॉर्ड म्हणून २४० मिलियन डॉलर म्हणजेच १७२१ कोटी रूपये दिले जाणार आहेत. यातही २ मिलियन डॉलर इतका त्यांचा पगार वेगळा दिला जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने सुंदर पिचाई यांनी काही नवीन टार्गेट दिले आहेत. हे टार्गेट पूर्ण केल्यावर त्यांना अवॉर्ड दिला जाणार आहे. एकूण रकमेतील ६४० कोटी रुपये परफॉर्मन्स बेस्ड स्टॉकच्या रूपात असतील.
४७ वर्षीय पिचाई याच महिन्यात अल्फाबेटचे CEO म्हणून नियुक्त केले गेले आहेत. गुगलचे को-फाउंडर Larry Page याआधी अल्फाबेटचे CEO होते.
२०१६ मध्ये कंपनीने सुंदर पिचाई यांना २०० मिलियन डॉलर स्टॉकच्या रूपात दिले होते. तसेच गेल्यावर्षी त्यांना कंपनीकडून Restricted Stocks देण्यात येणार होते, पण त्यांनी त्याला नकार दिला होता. कारण त्यांना वाटत होतं की, त्यांना चांगला पगार मिळतो. Bloomberg Pay Index नुसार, २०१८ मध्ये गुगलने सुंदर पिचाई यांना १.९ मिलियन डॉलर दिले आहेत.
सुंदर पिचाई हे २००४ पासून गुगलसोबत जोडले गेले आहेत. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांचं हे यश पाहूनच त्यांना २०१५ मध्ये गुगलचे CEO करण्यात आलं होतं.