तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:59 IST2025-06-27T12:59:27+5:302025-06-27T12:59:55+5:30

Air India Plane Crash: विमान अपघात आणि आपत्कालीन लँडिंगच्या घटनांनी अनेकजण विमान प्रवास करायला घाबरत आहेत.

Air India Plane Crash: How old is the plane you will be travelling on? When was it serviced? Find out like this... | तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेला विमानअपघात आणि त्यानंतर अनेक विमानांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर विमानाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. वारंवार होणाऱ्या आपत्कालीन लँडिंग आणि अपघाताच्या घटनांमुळे अनेकजण तर विमान प्रवासालाही घाबरत आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल, तर त्या संबंधित विमानाची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ही माहिती तुम्ही अगदी सहजपणे शोधू शकता.

तुम्ही ज्या विमानातून उड्डाण करणार, ते किती जुने आहे, हे शोधण्यासोबतच, ते किती सुरक्षित आणि प्रगत आहे, हेदेखील जाणून घेऊ शकता. यामध्ये, तुम्ही त्याची देखभाल कशी केली गेली आहे, हेदेखील पाहू शकता. 

विमान किती जुने आहे हे कसे शोधायचे?

विमानाबद्दल माहिती शोधण्यासाठी अनेक वेबसाइट आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही सर्वकाही जाणून घेऊ शकता. या साईट्समध्ये FlightRadar24, FlightAware, Airfleets.net, Planespotters.net यांचा समावेश आहे. अशाच एका साईटबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

Flightradar24 वेबसाइट किंवा अॅप उघडा.

तुमच्या फ्लाईटचे नाव किंवा कोड एंटर करा.

फ्लाईट आयकॉनवर क्लिक करा.

स्क्रीनवर फ्लाईट डिटेल्स दिसतील.

खाली स्क्रोल केल्याने विमानाचा नोंदणी क्रमांक आणि वय दिसेल.

फ्लाईटचा रिअल टाइम ट्रॅकिंग

Flightradar24 जगभरातील हजारो फ्लाईट रिअल टाइममध्ये ट्रॅक करते. यासोबतच, विमानाबद्दल सर्व प्रकारची माहिती त्यात उपलब्ध आहे. हे टूल विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, जे वारंवार विमानाने प्रवास करतात.

विमानाचे वय किती असते?
विमानाचे वय साधारणपणे २० ते २४ वर्षे असू शकते. त्यानंतर त्याची सेवा संपते. तथापि, देशात अशा अनेक फ्लाईट्स आहेत, ज्या ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. म्हणूनच तज्ञांनी त्यामध्ये प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः जेव्हा तुम्हाला लांब अंतर कापायचे असते. अनेकदा जुनी विमाने पूर्णपणे सक्षम असतात, कारण त्यांची देखभाल चांगल्या प्रकारे केलेली असते. त्यामुळे उड्डाण करण्यापूर्वी त्या विमानाची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.

Web Title: Air India Plane Crash: How old is the plane you will be travelling on? When was it serviced? Find out like this...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.