'इथे' पुरूषांना दोन लग्न करणं असतं बंधनकारक, जर नकार दिला तर जावं लागतं तुरूंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:41 IST2025-10-07T17:40:12+5:302025-10-07T18:41:18+5:30
Weird Marriage Tradition : आपल्याला हे माहीत नसेल की, जगात एक असाही देश आहे जिथे पुरूषांना दोन लग्न करणं बंधनकारक असतं.

'इथे' पुरूषांना दोन लग्न करणं असतं बंधनकारक, जर नकार दिला तर जावं लागतं तुरूंगात
Weird Marriage Tradition : जास्तीत जास्त लोक आयुष्यात एकच लग्न करतात. पण याबाबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम बघायला मिळतात. काही लोक दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करतात. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक भाग असतो. मात्र, आपल्याला हे माहीत नसेल की, जगात एक असाही देश आहे जिथे पुरूषांना दोन लग्न करणं बंधनकारक असतं. त्याहून महत्वाची बाब म्हणजे एखाद्या पुरूषाने जर दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्यांना कठोर शिक्षाही होते.
जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाबाबत वेगळे नियम असता. आफ्रिका महाद्वीपातील देशांमध्ये तर हे नियम अधिक वेगळे आणि अजब असतात. येथील एका देशात पुरूषांना दोन लग्न करणं बंधनकारक आहे. जर एखाद्या पुरूषानं दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्याला कठोर शिक्षा दिली जाते. इरीट्रिया असं या आफ्रिकन देशाचं नाव आहे. इथे पुरूषांना दोन लग्न करणं अनिवार्य आहे. मग ते आनंदाने करा किंवा इच्छा मारून.
इरीट्रिया देशात दोन लग्न करणं बंधनकारक आहे. जर कुणी दोन लग्न करण्यास नकार दिला किंवा दोन पत्नी ठेवण्यास नकार दिला तर त्या व्यक्ती विरोधात कठोर कारवाई केली जाते. या व्यक्तीला आयुष्यभर तुरूंगातही रहावं लागू शकतं.
इरीट्रिया देशात महिलांमुळे हा कायदा बनवण्यात आला आहे. इरीट्रिया देशात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. इरीट्रियाचं इथियोपियासोबत गृहयुद्ध सुरू आहे. ज्यामुळे इथे महिलांची संख्या जास्त आहे.
सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या देशात महिलांसाठीही कठोर कायदे आहेत. इथे महिला पतीला दुसरं लग्न करण्यापासून रोखूही शकत नाहीत. जर त्यांनी पतीच्या दुसऱ्या लग्नावर आक्षेप घेतला तर त्यांनाही तुरूंगात टाकलं जातं.