Muhammad Malik : तब्बल पाच हजार तरुणींनी या तरुणाला पाठवला लग्नाचा प्रस्ताव, समोर आलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 17:00 IST2022-01-28T17:00:18+5:302022-01-28T17:00:56+5:30
Arranged Marriage: ब्रिटनमध्ये राहणाऱ्या Muhammad Malik या तरुणाने लग्नासाठी वधूचा शोध घेण्यासाठी त्याने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याला पाच हजारांहून अधिक मुलींनी लग्नासाठी त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवले. मोहम्मद मलिक हा सध्या २९ वर्षांचा आहे.

Muhammad Malik : तब्बल पाच हजार तरुणींनी या तरुणाला पाठवला लग्नाचा प्रस्ताव, समोर आलं असं कारण
लंडन - ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद मलिक या तरुणाने लग्नासाठी वधूचा शोध घेण्यासाठी त्याने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्याने ब्रिटनमधील रस्त्यांवर बोर्ड लावले की, लग्नासाठी तो मुलीचा शोध घेत आहे. त्यानंतर त्याला पाच हजारांहून अधिक मुलींनी लग्नासाठी त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवले. मोहम्मद मलिक हा सध्या २९ वर्षांचा आहे.
मात्र आता मोहम्मदने एका डेटिंग अॅपसाठी हा स्टंट केला होता, हे समोर आले आहे. ट्विटरवरही मोहम्मद मलिकने लिहिले आहे की, लोक त्याला मुस्लिम डेटिंग अॅप Muzmatch वरही सर्च करू शकतात. मात्र सोशल मीडियावर काही लोकांनी दावा केला की, हा पूर्णपणे स्टंट हा Muzmatch अॅपसाठी केला गेला होता. तत्पूर्वी मोहम्मद मलिक याने एका अॅडमध्ये आपला फोटोसुद्धा लावला होता. एवढेच नाही तर त्याने #FindMalikAWife हॅशटॅगही सोशल मीडियावर खूप प्रसारित केला होता. तसेच findMALIKswife.com अशी वेबसाईटही तयार केली होती.
डेली स्टारच्या दाव्यानुसार मोहम्मह मलिक हा तरुण लंडनमध्ये राहतो. त्याने बर्मिंगहॅम, लंडनसह अनेक ठिकाणी या हटके लग्नाचा बोर्ड लावला होता. त्यामध्ये त्याने मला अरेंज मॅरेजपासून वाचवा, असा बोर्ड लावला होता. दरम्यान, सोशल मीडियावर काही लोकांनी लिहिले आहे की, हे महाशय पूर्वीपासूनच विवाहित आहेत, असं वाटतं, तसेच #FindMalikAWife हा बगसपणा आहे, असे दिसते.
दरम्यान, findmalikawife.com वर गेले असता आता findmalik on muzmatch असे लिहिलेले दिसते. याबाबत Muzmatch चे फाऊंडर शहजाद यूनिस यांनीसुद्धा ट्विट केले आहे. त्यात लिहिले आहे की, सिक्रेट्स आऊट. त्यानंतर काही युझर्सनी विचारले की, खरोखरच मोहम्मद मलिक हा सिंगल आहे का, कारण ज्या व्हिडीओ कँपेनमध्ये तो दिसतो. त्यामध्ये त्याच्यामागे एक महिला बसलेली दिसते. तर काही युझर्सनी लिहिले की, मलिकचा या अॅडमध्ये केवळ वापर करण्यात आला आहे, असं वाटतो तो विवाहित आहे.
दरम्यान, Muzmatch चे फाऊंडर शाहजाद युनिस यांनी सांगितले की, हे कॅम्पेन अगदी खरे आहे. त्याला खरोखरच जोडीदाराचाशोध आहे. तसेच तो Muzmatch चा कर्मचारीही नाही.