Video - वय हा फक्त आकडाच! 98 व्या वर्षी महिलेने पूर्ण केली 5 किमीची रेस; आला पहिला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 12:25 IST2023-03-05T12:25:07+5:302023-03-05T12:25:51+5:30

98 वर्षांच्या महिलेने फक्त 59 मिनिटे आणि 6 सेकंदात 5 किमीची शर्यत पूर्ण केली.

98 year old woman completes atlanta 5 kilometer race in less than 1 hour | Video - वय हा फक्त आकडाच! 98 व्या वर्षी महिलेने पूर्ण केली 5 किमीची रेस; आला पहिला नंबर

Video - वय हा फक्त आकडाच! 98 व्या वर्षी महिलेने पूर्ण केली 5 किमीची रेस; आला पहिला नंबर

वय फक्त एक संख्या आहे असं बर्‍याचदा लोकांनी म्हटलेलं ऐकले असेल. बरेच लोक वाढत्या वयानंतरच्या जीवनातील परिस्थितीसमोर हार मानू लागतात, तर काही लोक त्यांच्या आवडीनुसार जगण्याचा आनंद घेतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही महिलेचं कौतुक कराल. 

98 वर्षांच्या महिलेने फक्त 59 मिनिटे आणि 6 सेकंदात 5 किमीची शर्यत पूर्ण केली. यासह, तिने तिच्या वयोगटात प्रथम स्थान मिळविले. Betty Lindberg असं या अमेरिकन महिलेचं नाव आहे, जिने पब्लिक्स अटलांटामध्ये शर्यत जिंकली आहे. हे व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की महिलेने फिनिश लाईन ओलांडताच लोक मोठ्या कौतुकाने तिचे स्वागत करत होते. यावेळी महिला तिच्या हातात बांधलेल्या घड्याळात वेळ पाहत होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुड न्यूज मूव्हमेंट नावाच्या अकाऊंटवरून हा व्हि़डीओ शेअर करण्यात आला आहे. लोकांना तो खूप आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 20 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 2 लाखाहून अधिक 58 हजाराहून अधिक लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: 98 year old woman completes atlanta 5 kilometer race in less than 1 hour