वयवर्ष ६३ पण डान्स असा की जणू १३ वर्षाची मुलगीच, आजीबाईंचा हा हटके अंदाज पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:24 IST2021-08-29T18:24:48+5:302021-08-29T18:24:57+5:30
या आजीबाईंचा उत्साह पाहुन तुम्ही हरखुन जाल. तुम्हालाही त्यांचा हेवा वाटेल इतका सुंदर डान्स करतायत. त्यांचा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही डान्स करावासा वाटेल.

वयवर्ष ६३ पण डान्स असा की जणू १३ वर्षाची मुलगीच, आजीबाईंचा हा हटके अंदाज पाहिला का?
काही व्यक्तींचे वय कितीही असू देत त्यांच्यातील उत्साह हा तरुणाईला लाजवेल इतका असतो. त्यांच्यातील सळसळती उर्जा सर्वांनाच आश्चर्यचकित करते. अशाच एका आजीबाईंचा उत्साह पाहुन तुम्ही हरखुन जाल. तुम्हालाही त्यांचा हेवा वाटेल इतका सुंदर डान्स करतायत. त्यांचा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही डान्स करावासा वाटेल.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवी बाला शर्मा या माधुरी दिक्षीतच्या 'दिल तो पागल है' या सिनेमातील ‘चाक धुम धुम’ या हिंदी गाण्यावर डान्स करत आहेत. अगदी लहान मुलीप्रमाणे केसांच्या दोन वेण्या बांधून गुलाबी ड्रेस परिधान करुन त्या नाचत आहेत. त्यांच्या डान्समधल्या स्टेप्स अत्यंत साध्या आणि जबरदस्त आहेत. त्यांना पाहुन या आजीबाई थकत तरी असतील का? असा प्रश्न पडतो. कारण हा डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नाही.
इन्स्टाग्रामवरील हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी या व्हिडीओला आपल्या पर्सनल अकाऊंटवर शेअर केले आहे. सध्या आजीबाईंच्या या डान्सची सगळीकडे एकच चर्चा होत आहे.