५० वर्षांच्या आईसाठी आस्था शोधते आहे पती; सोशल मीडियात कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 05:43 IST2019-11-03T05:43:16+5:302019-11-03T05:43:52+5:30

मुळात अशा प्रकारच्या घटना सामान्यपणे पुस्तकांमध्ये आणि सिनेमांत बघायला मिळतात.

50 year old mother looks for her husband; Appreciation on social media! | ५० वर्षांच्या आईसाठी आस्था शोधते आहे पती; सोशल मीडियात कौतुक!

५० वर्षांच्या आईसाठी आस्था शोधते आहे पती; सोशल मीडियात कौतुक!

साधारणपणे आपण पाहिलं आणि ऐकलं आहे की, एक आई तिच्या मुलीसाठी नवरा मुलगा शोधते. पण याच भूमिका बदलल्या तर? सध्या सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला असून यातील कॅप्शनने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आस्था वर्मा नावाच्या एका ट्विटर युजरला तिच्या आईसाठी एक ५० वर्षीय सुंदर पती हवा आहे. सोबतच आस्थाने लिहिले आहे की, होणारा पती हा शाकाहारी असावा आणि मद्यसेवन करणारा नसावा. ट्विटरवरील प्रोफाइलनुसार, आस्था एक लॉ स्टुडंट आहे. आस्थाचं हे पाऊल अनेकांना पसंत पडलंय. त्यामुळे तिचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

मुळात अशा प्रकारच्या घटना सामान्यपणे पुस्तकांमध्ये आणि सिनेमांत बघायला मिळतात. त्यात मुलं आई-वडिलांचे चांगले मित्र असतात. पण ही पोस्ट पाहून लोक खूपच भावुक झाले आहेत. इतकेच काय तर काही लोकांनी तर मुलाकडची स्थळेही सुचवली आहेत. आस्थाने गुरुवार, ३१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी हे ट्विट केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत याला १७.७ हजार लाइक्स मिळाळ्या आहेत तर ७,४०० लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. ज्याप्रमाणे या पोस्टवर कमेंट येताहेत त्यावरून हेच दिसून येतं की, पन्नाशीतील बरेच लोक जोडीदाराच्या शोधात आहेत.
एका व्यक्तीने आस्थाला मॅट्रिमोनिअल साइटवर जाण्याचा सल्ला दिला. त्यावर आस्थाने उत्तर दिलं की, तिने सगळीकडे शोधलं; पण चांगला मुलगा मिळाला नाही!
 

Web Title: 50 year old mother looks for her husband; Appreciation on social media!