36 वर्षीय अॅडल्ट स्टारने केली आत्महत्या, आईला बसला धक्का; मित्रांनी मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 15:33 IST2024-02-20T15:30:00+5:302024-02-20T15:33:00+5:30
रिपोर्ट्सनुसार काग्नीने आत्महत्या केल्याचं समजतं. तिच्या मृत्यूची बातमी तिच्या मैत्रिणींनी जाहीर केली.

36 वर्षीय अॅडल्ट स्टारने केली आत्महत्या, आईला बसला धक्का; मित्रांनी मागितली मदत
36 वर्षीय प्रसिद्ध अॅडल्ट स्टार कग्नी लिन कार्टर (Kagney Linn Karter) चं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार काग्नीने आत्महत्या केल्याचं समजतं. तिच्या मृत्यूची बातमी तिच्या मैत्रिणींनी जाहीर केली.
TMZ च्या रिपोर्टनुसार, 36 वर्षीय काग्नीने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. पोर्टलवर प्रकाशित वृत्तानुसार, काग्नीने गुरूवारी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. तिच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या मृत्यूची बातमी दिली आणि हेही सांगितलं की, करिअर चांगलं सुरू असूनही काग्नी मेंटल हेल्थसंबंधी समस्यांनी ग्रस्त होती.
पोस्टमध्ये लिहिण्यात आलं की, दुर्दैवाने यशस्वी करिअर आणि टॅलेंटेड असूनही काग्नी गेल्या काही वर्षांपासून मानसिक आरोग्यासंबंधी समस्यांसोबत लढत होती. मैत्रिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मित्रांनी मानसिक आरोग्यासंबंधी जागरूकता पसरवण्यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू केलं आहे. तसेच त्यांनी काग्नीच्या आईला आर्थिक मदत करण्याचंही आवाहनही केलं आहे. जेणेकरून ती मुलींवर अंत्यसंस्कार करू शकेल.
ते असंही म्हणाले की, फंडमधून आलेल्या पैशातील जेवढे पैसे वाचतील ते अॅनिमल रेस्क्यूसाठी खर्च केले जातील. काग्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आम्ही तिची आई टीनाकडून फंड रेज करत आहोत.
मित्रांनुसार, 36 वर्षीय काग्नी एक परफॉर्मर, सिंगर, डान्सर, एक चांगली मुलगी आणि चांगली मैत्रीण होती. 2000 साली काग्नीने अॅडल्ट सिनेमात डेब्यू केलं होतं. अनेक अवार्डही तिने जिंकले होते. तिला पोल डान्सिंगमध्ये करिअर करायचं होतं. अॅडल्ड सिनेमे सोडून तिला पोल डान्सिंग स्टुडिओ सुरू करायचा होता. पण आता ती आपल्यात नाही.