31 वर्षीय महिलेने 13 वर्षाच्या मुलासोबत ठेवले संबंध, प्रेग्नेंट झाली; नंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 12:48 IST2023-03-06T12:30:05+5:302023-03-06T12:48:04+5:30

Crime News : महत्वाची बाब म्हणजे तिने गुन्हा कबूल केला आहे. ही घटना गेल्यावर्षी घडली होती. तेव्हा तिला अटक करण्यात आली होती आणि तिने एका बळाला जन्मही दिला होता.

31 year old woman had sex with 13 year old boy became pregnant but not not served jail | 31 वर्षीय महिलेने 13 वर्षाच्या मुलासोबत ठेवले संबंध, प्रेग्नेंट झाली; नंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का

31 वर्षीय महिलेने 13 वर्षाच्या मुलासोबत ठेवले संबंध, प्रेग्नेंट झाली; नंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का

Woman had sex with Minor: अमेरिकेच्या कोलोराडमधून एक लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका 31 वर्षीय महिलेने एका 13 वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले होते.  ज्यानंतर ती प्रेग्नेंट झाली होती. लैंगिक शोषण करूनही महिला तुरूंगात जाणार नाहीये. महत्वाची बाब म्हणजे तिने गुन्हा कबूल केला आहे. ही घटना गेल्यावर्षी घडली होती. तेव्हा तिला अटक करण्यात आली होती आणि तिने एका बळाला जन्मही दिला होता.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कोलोराडोच्या फाउंटेनमध्ये राहणारी एंड्रिया सेरानो (Andrea Serrano) नावाच्या महिलेने 13 वर्षीय मुलासोबत संबंध ठेवले होते. त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. आता पीडित  पक्षाचे वकील आणि महिलाच्या वकिलांमध्ये करार झाला. ज्यानुसार, एंड्रियाला गुन्हेगार तर मानलं गेलं. पण या करारामुळे तिला तुरूंगात जावं लागणार नाही. एंड्रियाने हा करार मान्य केला आहे. पण मुलाची आई या कराराने मुलाची आई खूश नाही.

एंड्रिया सेरानो (Andrea Serrano) वर पीडित मुलाचा विश्वास तोडने, लैंगिक शोषण आणि हल्ला करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला होता. ज्यानुसार एंड्रियाला अटक करण्यात आली होती. त्यावेळी ती प्रेग्नेंट होती. त्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला होता. बाळ आता महिलेच्या देखरेखीत आहे.

पीडित मुलाची आई या करारामुळे संतुष्ट नाही आणि याबाबत नाराजीही व्यक्त केली. मुलाची आई म्हणाली की, मला असं वाटत आहे की, कुणीतरी माझ्या मुलाचं बालपण हिसकावूण घेतलं. तो आता फक्त 14 वर्षांचा आहे आणि सगळं आयुष्य त्याला ही गोष्ट घेऊन जगायचं आहे. 

मुलाची आई पुढे म्हणाली की, याच जागी जर जर पीडित कुणी मुलगी असती आणि एखाद्या पुरूषाने असं केलं असतं तर त्याला शिक्षा मिळाली असती. पण या केसमध्ये आरोपी एक महिला आहे. त्यामुळे सहानुभूती दाखवली जात आहे.

Web Title: 31 year old woman had sex with 13 year old boy became pregnant but not not served jail