उंची कमी असल्याने तरूणाला नवरी मिळेना, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला - मॅडम, माझं लग्न लावून द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:54 PM2021-03-12T12:54:45+5:302021-03-12T13:16:09+5:30

हा तरूण महिला पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने मागणी केली की, मॅडम माझं लग्न लावून द्या. मी कधीपर्यंत एकटा राहू.

UP 2 feet long man appeals police to find him a bride Shamli | उंची कमी असल्याने तरूणाला नवरी मिळेना, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला - मॅडम, माझं लग्न लावून द्या!

उंची कमी असल्याने तरूणाला नवरी मिळेना, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला - मॅडम, माझं लग्न लावून द्या!

Next

(All Image Credit : aajtak.in)

यूपीतील शामली जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. शामलीमधील एका तरूणाने पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून त्याचं लग्न लावून देण्याची मागणी केली आहे. तरूण म्हणाला की, त्याची उंची २ फूट असल्याने त्याला नवरी मिळत नाहीये. त्यामुळे त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मदतीसाठी आवाहन केलं आहे. 

हा तरूण महिला पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने मागणी केली की, मॅडम माझं लग्न लावून द्या. मी कधीपर्यंत एकटा राहू. या तरूणाने सांगितले की, त्याची उंची दोन फूट असल्याने त्याला नवरी मिळत नाहीये आणि नवरी मिळाली तरी घरातील लोक लग्न लावून देत नाहीत. त्यामुळे तो हैराण झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शामलीच्या जनपद भागात राहणारा २६ वर्षीय तरूण मोहम्मद अजीम याची उंची कमी आहे. २ फूट उंची असल्याने अजीमला लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये.  अजीम गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नाबाबत चिंतेत आहे. तो सतत लोकांना त्याचं लग्न लावून देण्याची मागणी करत आहे. 

आता अजीमने शामलीच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून लग्न लावून देण्याची मागणी केली आहे. तो म्हणाला की तो महिला पोलीस स्टेशनसोबतच एसडीएम आणि कोतवालाकडे जाऊनही त्याने लग्न लावून देण्याबाबत सांगितलं आहे. पण त्याची मागणी पूर्ण झालेली नाही. 

याआधीही हा तरूण अनेक अधिकाऱ्यांच्या पत्रांसोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता पुन्हा एकदा लग्नाच्या मागणीमुळे तो चर्चेत आला आहे. तो म्हणाला की, मी लग्न लावून देण्याची मागणी घेऊन महिला पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. पण माझी मागणी पूर्ण केली गेली नाही. आता बघुया या तरूणाला लग्नासाठी नवरी कधी मिळते.
 

Web Title: UP 2 feet long man appeals police to find him a bride Shamli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.