भुसावळला रक्तरंजित पहाट; भर चौकात गोळीबार करून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:47 IST2025-01-10T11:44:38+5:302025-01-10T11:47:41+5:30

भुसावळमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर

Youth shot dead in Bhusawal square Police begin investigation | भुसावळला रक्तरंजित पहाट; भर चौकात गोळीबार करून तरुणाचा खून

भुसावळला रक्तरंजित पहाट; भर चौकात गोळीबार करून तरुणाचा खून

वासेफ पटेल

भुसावळ (जि.जळगाव) : शहरात खुनाची मालिका सुरूच आहे. ३२ वर्षीय तरुणावर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. ही थरारक घटना जाम मोहल्ला भागात शुक्रवारी सकाळी ७.३०वाजता घडली. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती मिळाली.

तहरीन नासीर शेख ( वय अंदाजे ३२) असे मृताचे नाव आहे. दुचाकीवरून आलेल्या चारपैकी तीन संशयितांनी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. घटनेनंतर संशयित त्वरित फरार झाले. फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी आजची  घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Youth shot dead in Bhusawal square Police begin investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.