थ्रेशर मशिनमध्ये पाय अडकून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 16:21 IST2019-09-29T16:20:58+5:302019-09-29T16:21:24+5:30
घटनेची माहिती मिळताच आजूबाजुच्या शेतात काम करणाºया शेतकरी व मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.

थ्रेशर मशिनमध्ये पाय अडकून तरुणाचा मृत्यू
जळगाव : उडीद मूग काढत असताना थ्रेशर मशीनमध्ये पाय अडकल्याने विजय राजाराम कोळी (३६) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजता तालुक्यातील शेळगाव येथे घडली. विजय कोळी हा तरुण रविवारी सकाळी शेळगाव शेत शिवारात भूषण दिलीप पाटील यांच्या शेतावर रोजंदारीने थ्रेशर मशिनद्वारे उडीद मूग काढण्यासाठी कामावर गेला होता. दुपारी १.३० वाजता मशीनवर चढत असतांना तोल जाऊन त्याचा पाय मशीनमध्ये अडकला व काही क्षणातच त्याचा कमरेपासूनचा खालचा भाग चेंदामेंदा झाला होता. या घटनेत प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजुच्या शेतात काम करणाºया शेतकरी व मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश चौधरी यांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी सारला, मुलगा ओम, मुलगी प्रांजल, आई-वडील, दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे. प्राथमिक तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहे.