शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

झटापट करून तरुणाचा मोबाइल, पैसे लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

जळगाव : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पावसामुळे दुकानाच्या पायरीवर थांबलेल्या योगेश कैलास शिरसाळे (रा. समता नगर) या तरुणाशी झटापट करुन ...

जळगाव : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पावसामुळे दुकानाच्या पायरीवर थांबलेल्या योगेश कैलास शिरसाळे (रा. समता नगर) या तरुणाशी झटापट करुन त्याच्या हातातील मोबाइल, तीनशे रुपये व एटीएम कार्ड घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता नेरी नाका स्मशानभूमीजवळ घडली. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक करण्यात आली. संदीप तुकाराम सोनवणे (वय २५), गोकूळ पांडुरंग जाधव (वय २७, दोन्ही रा.मारुती पेठ) व प्रशांत प्रताप चौधरी (रा.शंकरराव नगर) अशी तिघांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हा नूतन मराठा महाविद्यालयात पदवीच्या प्र‌थम वर्षाला शिक्षण घेत आहे. रविवारी अजिंठा चौकाकडे असताना दुपारी अडीच वाजता योगेश हा मित्र अमोल सुनील वडनेरे याला सराफ बाजारात घ्यायला जात असताना पाऊस सुरू झाल्यामुळे नेरी नाका स्मशानभूमीजवळील व्यापारी संकुलाच्या पायरीजवळ थांबला असता दुचाकीवरून तीन जण आले. त्यांनी योगेशशी झटापट करून मोबाइल, पैसे व एटीएमकार्ड घेऊन पलायन केले. यावेळी योगेश याने गोपाळपुरा, का.ऊ.कोल्हे शाळेपर्यंत पाठलाग केला असता ते दुचाकीवरून खाली पडले. त्यामुळे दुचाकी जागेवरच सोडून पळून गेले.

दरम्यान, सायंकाळी योगेश याने संशयितांची दुचाकी घेऊन शनिपेठ पोलीस स्टेशन गाठले. गुन्हे शोध प‌थकातील सहायक फौजदार रवींद्र पाटील, अमोल विसपुते, अभिजित सैदाणे,परीश जाधव, मुकुंद गंगावणे, अनिल कांबळे, राहुल पाटील व राहुल घेटे यांनी दुचाकी नंबरवर संशयितांची नावे निष्पन्न केली. सोमवारी पहाटे या प्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप व गोकूळ यांना सकाळी तर प्रशांत याला सायंकाळी अटक करण्यात आली. अटकेतील न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उपनिरीक्षक खेमराज परदेशी तपास करीत आहेत.