अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 15:36 IST2020-09-20T15:36:42+5:302020-09-20T15:36:54+5:30
रईस हा भंगार गोळा करण्याचे काम करीत होते. दररोज दुचाकीवरुन फिरत परिसरातील गावांमधुन भंगार गोळा करायचे. भंगार विक्रीतून येणाऱ्या पैशांतून ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते.

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
जळगाव - कानळदा येथून ममुराबादला घरी येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने रईस हबीबशहा फकीर (वय ३८, रा.ममुराबाद) हा तरुण जागेवरच ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्री ९ वाजता कानळदा ते ममुराबाद रस्त्यावर झाला.
रईस हा भंगार गोळा करण्याचे काम करीत होते. दररोज दुचाकीवरुन फिरत परिसरातील गावांमधुन भंगार गोळा करायचे. भंगार विक्रीतून येणाऱ्या पैशांतून ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, १९ सप्टेबर रोजी ते नेहमीप्रमाणे दुचाकीने कानळदा परिसरतील गावात गेला होता. रात्री ९ वाजता ममुरााबाद येथे घरी येत असताना त्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. रस्त्यावरील इतर वाहनचालकांच्या लक्षात ही बाब आली. यानंतर त्यांनी ओळख पटवल्यानंतर ममुराबाद येथील रईसच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे रईस यांच्या कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. रईस यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहिण, पत्नी व सहा मुली असा परिवार आहे. या दुर्देवी अपघातात सहा मुलींचा पिता असलेल्या रईस यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरीकांनी हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इश्वर लोखंडे तपास करीत आहेत.