रेल्वे रुळावर झोपून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 20:26 IST2020-12-17T20:26:47+5:302020-12-17T20:26:59+5:30
जळगाव : रेल्वे रुळावर झोपून २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाने धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ...

रेल्वे रुळावर झोपून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
जळगाव : रेल्वे रुळावर झोपून २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाने धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेत तरुणाचे डोके शरीरापासून वेगळे झाले आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली आहे. बजरंग बोगद्याजवळ डाऊन रेल्वे लाइनवर खंबा क्रमांक ४१८/१३-१५ येथे गोदान एक्स्प्रेस समोर अंदाजे २५ ते २७ वर्षीय अनोळखी तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार हवालदार रामराव इंगळे व कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनेत तरुणांचे डोके शरीरापासून वेगळे झाल्याचे या वेळी दिसून आले. लोहमार्ग पोलिसांनी हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे. याप्रकरणी स्टेशन प्रबंधक आर.के.पालरेचा यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत तरुणाच्या अंगात पांढरा फुल बाहीचा शर्ट व नेसनीस नीळी फुलपँन्ट व नीळी अंडर विअर आहे असे मयताचे वर्णन आहे. ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.