सरपंचाकडून तरुणाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:35 IST2019-11-18T22:35:22+5:302019-11-18T22:35:31+5:30
जळगाव : सामाईक बांधावर गुरे चारत असताना आपल्या शेताचे नुकसान करतो या कारणावरुन रणजीत ताराचंद राठोड (३०) या तरुणाला ...

सरपंचाकडून तरुणाला बेदम मारहाण
जळगाव : सामाईक बांधावर गुरे चारत असताना आपल्या शेताचे नुकसान करतो या कारणावरुन रणजीत ताराचंद राठोड (३०) या तरुणाला सरपंच राजाराम धिंगा चव्हाण यांच्यासह चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील सुभाषवाडी येथे घडली. तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचा आरोप जखमी तरुणाच्या कुटुंबाने केला आहे.
१४ रोजी दुपारी चार वाजता रणजीत सामाईक बांधावर गुरे चारत असताना रामलाल धिंगा चव्हाण यांनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर सरपंच राजाराम, भाऊ सिताराम चव्हाण व समाधान विजय जाधव यांना फोन करुन बोलावून घेतले. या चौघांनी शेतातच रणजीत याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी अद्यापही जखमीचा जबाब घेतला नाही नसल्याचा आरोप जखमी रणजीत याचा भाऊ पूनमचंद ताराचंद राठोड यांनी केला आहे.