वाकडी, जि. जळगाव - अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुनील विठ्ठल सोमवंशी (२४, रा. चिंचोली) हा तरुण ठार झाला. दुचाकीवरील इरफान अलीमखा तडवी (२०, रा. शेवगे) हा तरुण जखमी झाला. त्याला जळगाव येथे हलविण्यात आले. हा अपघात जामनेर तालुक्यातील वाकडी येथे बुधवारी रात्री झाला.
जामनेर तालुक्यातील वाकडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:10 IST