जळगावातील तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 18:21 IST2017-06-17T18:21:46+5:302017-06-17T18:21:46+5:30

तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

The young girl of the Jalgaon threw his neck with a sharp weapon | जळगावातील तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून

जळगावातील तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 - जळगावातील मेहरुण परिसरातील  दत्तनगरातील रहिवाशी असलेल्या नावीद अख्तर शफीकोद्दीन पिरजादे (वय 25) या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शिरसोली येथील आकाशवाणी केंद्राच्या ¨भतीला लागून या तरुणाचा मृतदेह आढळून आला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मानेवर व कमरेवर जोरदार वार करुन नावीदचा खून केल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे.
 याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नावीद हा न्यू.बी.जे.मार्केट परिसरात शकील खान मोहम्मद खान (रा. जळगाव) यांच्याकडे कामाला होता. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता तो कामावरून घरी गेला. त्यानंतर रात्री आठ वाजता नमाज पठणासाठी घराबाहेर पडला. शनिवारी सकाळी शिरसोली येथे त्याचा मृतदेहच आढळून आला. शुक्रवारी त्याला दोन जणांसोबत जाताना काही लोकांनी पाहिले होते, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: The young girl of the Jalgaon threw his neck with a sharp weapon