चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे - लोंढे धरणाच्या काँक्रिटीकरणाचे काम डिसेंबर मध्ये सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 04:20 PM2017-11-09T16:20:16+5:302017-11-09T16:32:12+5:30

आमदार उन्मेष पाटील यांनी दिली माहिती

The work of the Varakhade-Londhe dam in Chalisgaon taluka will start in December | चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे - लोंढे धरणाच्या काँक्रिटीकरणाचे काम डिसेंबर मध्ये सुरु होणार

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे - लोंढे धरणाच्या काँक्रिटीकरणाचे काम डिसेंबर मध्ये सुरु होणार

googlenewsNext
ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील महत्वाचा जलप्रकल्पमन्याड धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सुचना२०१८ मध्ये वरखेडे-लोंढे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव दि. ९ : चाळीसगाव तालुक्यासाठी वरदान ठरणाºया वरखेडे - लोंढे धरणाच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना १ डिसेंबर पासून सुरुवात होऊन हा जलप्रकल्प २०१८ मध्ये पूर्ण केला जाईल. याबरोबरच मन्याड धरणाच्या उंची वाढविण्या प्रस्तावही दाखल करण्यात येईल, अशी माहिती आमदार उन्मेष पाटील यांनी दिली.
मंगळवार ७ रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. याच बैठकीत चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे - लोंढे आणि मन्याड धरणाबाबत आढावा घेऊन महाजन यांनी याबाबत सुचना दिल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. आढावा बैठकीस राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार उन्मेष पाटील, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ, चंदू पटेल यांच्यासह जलसंपदा विभागातील सर्व सचिव उपस्थित होते.
वरखेडे - लोंढे धरणाच्या पिअर्स (काँक्रीट प्रस्तंभ) उभारण्याचे काम डिसेंबर मध्ये सुरु करण्याचे निर्देश आढावा बैठकीत दिले. मन्याड धरणाची उंची वाढविण्याची मागणीही सातत्याने होत आहे. याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना महाजन यांनी दिल्या आहे. २०१८ मध्ये वरखेडे - लोंढे धरणाचे काम पूर्र्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The work of the Varakhade-Londhe dam in Chalisgaon taluka will start in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.