ठळक मुद्देअसोदा व शेळगाव येथे ४३ लाखांच्या पूल व रस्त्याचे भूमिपूजनशेळगावातील काँक्रिटीकरणासाठी आमदार निधीतून ३ लाख रुपयेमंजूर असलेल्या रस्ते कामाची लवकरच होणार सुरूवात

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. ६ : ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते, पाणी या सुविधा मिळवून देण्यासाठी  सतत प्रयत्नशील आहे. असोदा येथील सुमारे ५ कोटींची योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला वेळ प्रसंगी धारेवर धरले असे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जळगाव तालुक्यातील असोदा येथील इंदिरानगर रस्त्यावरील पुलाचे तसेच असोदा - शेळगाव येथील गावांतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन सोमवारी झाले यावेळी ते बोलत होते. गुलाबराव यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले. असोदा येथील महादेव मंदिर परिसरात काँक्रीटीकरण करण्याच्या कामावर ६ लाख तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील परिसररात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ५ लाख रुपये खर्च होणार आहेत. पुलाच्या कामासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी म्हणाले. शेळगाव येथील गावांतर्गत काँक्रिटीकरणासाठी आमदार निधीतून ३ लाख रुपये देणार असल्याचेही ते म्हणाले.
 ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी रस्त्यांची कामे करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी व जनतेच्या हितासाठी जळगाव ग्रामीण मतदार संघात रस्ते विकासाची कामे पूर्ण करायला कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.मंजूर असलेल्या रस्ते कामाची लवकरच सुरुवात होईल. पुढील दोन वर्षांत राहिलेल्या विकास कामांचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न राहील.
व्यासपीठावर डॉ. कमलाकर पाटील, सेना तालुका प्रमुख नाना सोनवणे, बापू महाजन, भोजु महाजन, तुषार पाटील, किरण महाजन, किशोर चौधरी, उपसरपंच अरुण बापू पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर चौधरी यांनी तर आभार तुषार महाजन यांनी मानले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.