शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात वडील, आई आणि आता मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST

जळगाव : अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने विजय प्रल्हाद शिनकर (४८, मूळ रा. वरणगाव, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाल्याची घटना ...

जळगाव : अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने विजय प्रल्हाद शिनकर (४८, मूळ रा. वरणगाव, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे चार वाजता गुड्डूराजानगराला लागून असलेल्या बी.जे.नगरात उघडकीस आली. ही घटना आत्महत्या आहे की तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. शिनकर यांच्या परिवारात वडील, आई आणि आता मुलाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची शृंखला सुरू आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.जे.नगरातील सिद्धांत अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर विजय शिनकर हे पत्नी कल्पना, मुलगी श्रद्धा व मुलगा सारंग असे चौघे वास्तव्याला होते. शिनकर हे वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करायचे. दोन वर्षांपूर्वीच ते वरणगाव येथून जळगावात स्थायिक झाले. सिद्धांत अपार्टमेंटमध्ये त्यांनी स्वत:चा फ्लॅट घेतलेला होता. शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पत्नी व दोन्ही मुलांशी त्यांनी गप्पा मारल्या. त्यानंतर सर्व जण झोपले. शनिवारी पहाटे चार वाजता मुलगा सारंग हा लघुशंकेसाठी उठला असता वडील जागेवर दिसले नाहीत. बाथरूमध्येही नसल्याने तो इमारतीच्या गच्चीवर बघायला गेला, तेथेही ते नव्हते. त्यामुळे त्याने बहीण श्रद्धा हिला उठवले व दोघे जण खाली आले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून त्यांनी आक्रोश केला. पत्नी व शेजारच्या लोकांनी धाव घेऊन त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आई, वडिलानंतर मुलाचा मृत्यू

शिनकर परिवारात वर्षभरात मृत्यूची ही तिसरी घटना आहे. वडील प्रल्हाद शिनकर यांचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन महिन्यांनी विजय यांच्या आईचा मृत्यू झाला, तर आता स्वत: विजय यांचा मृत्यू झाला. सलगच्या घटनांनी शिनकर परिवार हादरला आहे. विजय यांना एक बहीण असून ती विवाहित आहे. सुरत येथे वास्तव्याला आहे. ती दुपारी आल्यानंतर शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी श्रद्धा सीएचे तर मुलगा सातवीत शिक्षण घेत आहे.