शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी व युतीचा धर्म पाळला जाईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:35 IST

गेल्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेस व भाजप दक्ष

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यात आमदारकी भाजप अर्थात गावीत गटाकडे तर नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था या रघुवंशी अर्थात काँग्रेस गटाकडे अशी राजकीय स्थिती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. लोकसभेसाठी राजकीय गणिते बदलली असून पालिका निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेची झालेली युती आता दुभंगली आहे. भाजप-सेना एकत्र आली असली तरी मने जुळणे आवश्यक आहे. दुसरीकडे राष्टÑवादी खुल्या दिलाने काँग्रेसला कशी आणि कोणती मदत करते याकडे देखील लक्ष लागून राहणार आहे.नंदुरबार तालुका नवापूर आणि नंदुरबार अशा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तालुक्यातील सहा महसूल मंडळांपैकी दोन महसूल मंडळे हे नवापूर मतदारसंघात येत असल्यामुळे तालुक्यातील राजकीय समिकरणे नेहमीच दोलायमान असतात. सद्य स्थितीचा विचार करता नगरपालिका व पंचायत समिती काँग्रेसकडे आहेत. पालिका निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना युती चर्चेची ठरली होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने देखील या युतीने तयारी चालविली होती. परंतु लोकसभेला भाजप-सेना युती झाल्यामुळे आता सेनेला पक्ष आदेशामुळे काँग्रेसची साथ सोडावी लागणार असून भाजपच्या दृष्टीने ती जमेची बाजू ठरणार आहे.मने जुळतील का?काँग्रेस व भाजपकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी दोन्ही पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. घटक पक्षांना एकत्र करणे, चर्चा करणे, विविध माध्यमातून एकत्र येणे असे प्रकार काँग्रेस, भाजपमध्ये सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी व भाजप-सेनेची युती झाली आहे. दोन्ही पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. भाजप-सेनेने संयुक्त मेळावा व पत्रकार परिषद घेवून ‘झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे...’ या उक्तीप्रमाणे कामाला सुरुवात देखील केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये पाच वर्ष विस्तवही जात नव्हता. पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काँग्रेसच्या साथीने चार नगरसेवक सेनेचे निवडून आले होते. आता एकदिलाने काम करण्याची घोषणा केली असली तरी कार्यकर्त्यांची मने जुळली जातील का? हा प्रश्न कायम राहणार आहे.राष्टÑवादीची साथदुसरीकडे काँग्रेस व राष्टÑवादी यांची आघाडी देखील एकदिलाने काम करणार असे म्हणत आहे. गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीचे बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपकडे होते. अर्थात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना मानणारा वर्ग या पक्षात असल्यामुळे ते चित्र यंदाही कायम राहते किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे.काँग्रेसचा कार्यकर्त्यांवर भरकाँग्रेसकडे असलेली नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ या संस्थांच्या बळावर काँग्रेस तालुक्यात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. परंतु जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी प्रचारात सक्रीय राहणार नसल्याचा फटका सहन करावा लागणार आहे.एकुणच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची ही एक प्रकारे रंगीत तालीमच राहणार आहे. यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकसंघ ठेवणे व त्यांना उत्साहित करण्यासाठी आघाडी व युतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत.