लग्नाची तयारी सुरू असतानाच ट्रकच्या धडकेत जळगावचा तरूण ठार

By Admin | Updated: March 25, 2017 16:08 IST2017-03-25T16:08:09+5:302017-03-25T16:08:09+5:30

हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगावातील आहुजानगरजवळ झाला.

While preparing for marriage, Jalgaon's youth was killed in a truck crash | लग्नाची तयारी सुरू असतानाच ट्रकच्या धडकेत जळगावचा तरूण ठार

लग्नाची तयारी सुरू असतानाच ट्रकच्या धडकेत जळगावचा तरूण ठार

जळगाव : शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पाळधी येथून दुचाकीने जळगावात येत असलेल्या अविनाश भानुदास धनगर (वय 24, रा.पाळधी, ता. धरणगाव) या तरुणाच्या दुचाकीस भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने  तरुण ठार झाला. हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगावातील आहुजानगरजवळ झाला. दरम्यान, अविनाश याच्या लगAाची तयारी सुरु झाली होती, त्यासाठी मुलगीही निश्चित झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Web Title: While preparing for marriage, Jalgaon's youth was killed in a truck crash