‘गिरणा’तील जलसाठा ३३ टक्क्यांवर! दुसऱ्या आवर्तनामुळे घट, मार्च महिन्यात गाठणार पंचविशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 04:32 PM2024-02-21T16:32:32+5:302024-02-21T16:32:48+5:30

गेल्या महिन्यात गिरणा धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. दुसरे आवर्तन सोडण्याआधी हा साठा ३९ टक्क्यांवर होता.

Water storage in 'Girna' at 33 percent! Decline due to 2nd round: March will reach 25 | ‘गिरणा’तील जलसाठा ३३ टक्क्यांवर! दुसऱ्या आवर्तनामुळे घट, मार्च महिन्यात गाठणार पंचविशी

‘गिरणा’तील जलसाठा ३३ टक्क्यांवर! दुसऱ्या आवर्तनामुळे घट, मार्च महिन्यात गाठणार पंचविशी

जळगाव : दुसरे बिगर सिंचन आवर्तनामुळे गिरणा धरणातील जलसाठा ३३ टक्क्यांवर आला आहे. हा साठा ५ टक्क्यांनी घटला असून मार्च महिन्यात हा साठा पंचविशी गाठेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या कालावधीत शेकडो गावांच्या जलतृप्तीसाठी गिरणातील पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

गेल्या महिन्यात गिरणा धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. दुसरे आवर्तन सोडण्याआधी हा साठा ३९ टक्क्यांवर होता. दि.२१ रोजी हा साठा ३३ टक्क्यांवर आल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापाठोपाठ हतनूर व वाघूर धरणातील जलसाठा अनुक्रमे ८३ आणि ८२ टक्क्यांवर आला आहे.भोकरबारी धरणातील जलसाठा अवघ्या ७ टक्क्यांवर आला आहे. एरंडोलकरांना जलमाया देणाऱ्या अंजनी धरणातील जलसाठाही २५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे एरंडोलकरांनाही जपून पाणी वापरण्याची ‘एरंडोली’ करावी लागणार आहे.

या शहरांना चटका

मार्चनंतर एरंडोल, पारोळा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, चाळीसगाव, बोदवड या शहरांना पाणीटंचाईचा सर्वाधिक चटका बसणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. गिरणा धरणातून एकीकडे चाळीसगाव, पाचोरा, मालेगाव एमआयडीसींना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दुसरीकडे पिण्यासाठीही १९४ गावांसाठी पाणी राखीव ठेवावे लागणार आहे.त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाला यंदा मोठी कसरत करावी लागणार आहे.

प्रकल्पनिहाय गेल्यावर्षीचा व यंदाचा २१ फेब्रुवारीपर्यंतचा जलसाठा (टक्के)

प्रकल्प-२०२३-२०२४

हतनूर-८०.२९-८३.५३

गिरणा-५६.२१-३३.३७

वाघूर-८२.३६-८२.६२

सुकी-८०.७७-८६.५१

अभोरा-७८.५९-८६.६८

मंगरुळ-८०.१६-७६.५९

मोर-८३.६९-८३.२५

अग्नावती-५७.७०-१९.३६

हिवरा-५५.४२-३१.२७

बहुळा-६०.१३-५१.१८

तोंडापूर-६९.०३-७४.५८

अंजनी-४२.५२-२५.९३

गूळ-७९.४७-८०.५१

भोकरबारी-२३.३५-०७.३६

बोरी-५१.९५-२९.६१

मन्याड-५४.९०-००
 

Web Title: Water storage in 'Girna' at 33 percent! Decline due to 2nd round: March will reach 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.