जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:54 PM2018-04-11T17:54:47+5:302018-04-11T17:54:47+5:30

शेंदुर्णीत महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायतीत दाखल

Water dispute in the Jamnar taluka of the Water Resources Minister | जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात पाणीप्रश्न पेटला

जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात पाणीप्रश्न पेटला

googlenewsNext
ठळक मुद्देशेंदुर्णीत महिलांनी काढला ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चासंतप्त महिलांच्या प्रश्नांनी ग्रा.पं. पदाधिकाºयांची तारांबळगोविंद अग्रवाल यांनी जाणून घेतली महिलांची व्यथा

आॅनलाईन लोकमत
शेंदुर्णी ता.जामनेर, दि.११ : येथील अहिल्याबाई होळकर गल्ली व शनी मंदीराच्या मागील खळवाडी भागात पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी १० वाजता डोक्यावर हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले. महिलांच्या प्रचंड घोषणाबाजीने ग्रामपंचायत कार्यालय परिसर दणाणून गेला होता. महिलांना उत्तरे देता देता पदाधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील शेंदुर्णी हे महत्त्वपूर्ण गाव आहे. गावातील अहिल्याबाई होळकर गल्ली, शनी मंदिरामागील परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला, लहान मुले मुलींना दूर जावे लागत असते. त्रास असह्य झाल्याने ११ रोजी सकाळी १० वाजता महीलांचा ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा निघाला. मोर्चा ग्रामपंचायतीत आल्यानंतर माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. अग्रवाल यांनी तत्काळ तालुक्याचे बीडीओ, तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून नागरीकांच्या समस्या मांडल्या.

Web Title: Water dispute in the Jamnar taluka of the Water Resources Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.