शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

धरणगावला ऐन हिवाळयात टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 4:23 PM

ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही.

ठळक मुद्देआधी १३ दिवस आता अठरा दिवस होऊनही पाणी मिळेना  गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही.

धरणगाव : ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला  जात आहे. त्यामुळे एका नगरसेवकाने टॅंकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे, विशषे म्हणजे धरणगाव शहरात सर्व राजकीय पक्षांचे जिल्हास्तरिय पदाधिकारी वास्तव्यास आहेत. तरीही अशी विदारक परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणगाव शहरात कित्येक वर्षापासून पाण्याचे राजकारण सुरु आहे. चांगला पाऊस होऊन देखील तीच परिस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे.  नगरसेवक ललित येवले  हे  स्वखर्चाने  आपल्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. पाणीटंचाईची स्थिती तर उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येत असते.  उन्हाळ्यात एका टँकरला कमीतकमी ८०० रुपये मोजावे लागत असतात.  तेही खाजगी टँकर दोन किंवा तीन दिवस आधी बुक करावे लागते.  तेंव्हाच पाण्याचे टॅंकर उपलब्ध करुन दिले जाते. शहरात  गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पाण्यावरच राजकारण  सुरु आहे  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदार संघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती असल्याने नागरिक  संताप व्यक्त करीत आहेत. सणासुदीला अनेक लोक मूळ गावी म्हणजे धरणगावला येत असतात. त्यांनाही बाहेरून पाणी आणून भरावे लागत आहे. या ठिकाणी विरोधक मात्र मौन पाळून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

 रोटवद जवळ जलवाहीनी फुटलेली आहे.  त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. आपण स्वतः त्या ठिकाणी तीन दिवसापासून थांबून आहोत. त्या जलवाहिनीला खाली करण्यास तीन दिवस लागतात.  येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल. - नीलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव

 महिला  दिवसभर  महिला घरी राहतो व पाण्याची भटकंती करत असतो. सकाळी उठल्यापासून तेरात्रीच्या भांडी  धुण्यापर्यँत  आम्ही पाणी शोधत असतो.  गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या कायम आहे. -कल्पना मुसळे, रहिवाशी, धरणगाव  अठरा ते वीस दिवसानंतर आम्हाला पाणी हे मिळत असते मात्र आमच्याकडे पाहुणे आले असून सुद्धा तेही आमच्या सोबत पाणी भरण्याचा मला मदत करत असतात ही आजची धरणगाव ची परिस्थिती आहे.  -राखी पांडे, रहिवाशी, धरणगाव 

 पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही. पाण्याच्या प्रश्नावरून जनतेने त्यांना दोन ते तीन वेळेस प्रतिनिधित्व म्हणून निवडून दिले. पालिकेने प्रत्येक वार्डात टँकरने पाणी पुरवले पाहिजे व एवढ्या वर्षापासून सत्ता असूनदेखील पाण प्रश्न  सुटलेला नाही. - ललित येवले, नगरसेवक, धरणगाव 

टॅग्स :droughtदुष्काळDharangaonधरणगाव