दोन चिमुकल्यांसह विवाहितेची तापीत उडी

By Admin | Updated: June 18, 2017 17:58 IST2017-06-18T17:26:08+5:302017-06-18T17:58:40+5:30

दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला

Warm Plow With Two Pieces | दोन चिमुकल्यांसह विवाहितेची तापीत उडी

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची तापीत उडी

 

 ऑनलाईन लोकमत 
 
चोपडा/अमळनेर,दि.18- चहार्डी (ता.चोपडा) येथील अनुराधा सिद्धार्थ वारडे (26) या विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह जळोद-बुधगाव  रस्त्यावरील पुलावरून तापीत उडी घेतल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. कौटुंंबिक वादातून त्या विवाहितेने हे पाऊल उचलल्याचे समजते.
अनुराधा ही आज बुधगाव येथे आजोबांकडे आली होती. दुपारी ती आपल्या एक चार वर्षाची मुलगी व दीड वर्षाच्या मुलासह रिक्षाने तापीच्या पुलावर आली. कोणाला काही समजण्यापूर्वीच तिने दोन्ही चिमुकल्यांसह पुलावरून तापी नदीत उडी घेतली. नदीत दोन लहान मुले बुडतांना वाळकी येथील अतुल राजपूत याला दिसली. त्याने आरडाओरड केल्याने, बुधगाव येथील ग्रामस्थांनी नदीत उडी घेतली. त्यांच्या हाती दीड वर्षाचा मुलगा लागला. मात्र त्याला बाहेर काढेर्पयत त्याचा मृत्यू झाला होता. विवाहिता व मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी जळोद येथील पोलीस पाटील अशोक शिरसाठ थांबून होते. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

 

Web Title: Warm Plow With Two Pieces