शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विजू काम झाले.. म्हणताच अडकले तलाठी व कोतवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:16 IST

एसीबीची नगरदेवळा येथे कारवाई : पाच हजाराची लाच

जळगाव : विजू काम झाले...आता मी निघतो..असे म्हणताच शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच घेताना तलाठी मिलिंद जयवंत बच्छाव (५५, रा.कजगाव, ता.भडगाव) व कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे (४५, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नगरदेवळा, ता.पाचोरा येथे गुरुवारी दुपारी ही कारवाई झाली.तक्रारदार नगरदेवळा येथील तरुण शेतकरी आहे. त्यांच्या शेतात मका व कपाशी पीक लावलेले होते. ओल्या दुष्काळामुळे लागवडीचाही खर्च निघणे शक्य नाही, अशाही परिस्थितीत पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी बच्छाव याने कोतवाल धिवरे याच्या माध्यमातून शेतकºयाकडे पाच हजाराची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय पंचनामा न करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर शेतकºयाने गुरुवारी थेट जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. उपअधीक्षक जी.एम. ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार दिली. ठाकूर यांनी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याशी चर्चा करुन लागलीच पथक तयार केले. निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार रवींद्र माळी, मनोज जोशी, जनार्दन चौधरी,प्रशांत ठाकुर, नासीर देशमुख व महेश सोमवंशी यांच्या पथकाला घेऊन दुपारी नगरदेवळा गाठले. कोतवालाच्या माध्यमातून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांना अटक केली आहे. पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.दोघांच्या घराची झडतीतलाठी व कोतवाल या दोघांना पकडल्यानंतर उपअधीक्षक ठाकूर यांच्या पथकाने दोघांच्या घराची झडती घेतली. घरझडतीत नेमके काय आढळून आले याचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान, दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत काही तक्रारी असतील तर नागरिकांनी थेट तक्रार करावी असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव