महामार्गाने घेतला पोलीस दलाच्या विधी अधिकाऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:15 IST2021-01-21T04:15:36+5:302021-01-21T04:15:36+5:30

अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनिल पाटील यांच्या आईचे निधन झालेले आहे. त्यांचा गंधमुक्तीचा कार्यक्रम बुधवारी पारोळा येथे होता. त्या ...

The victim was a law enforcement officer on the highway | महामार्गाने घेतला पोलीस दलाच्या विधी अधिकाऱ्याचा बळी

महामार्गाने घेतला पोलीस दलाच्या विधी अधिकाऱ्याचा बळी

अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनिल पाटील यांच्या आईचे निधन झालेले आहे. त्यांचा गंधमुक्तीचा कार्यक्रम बुधवारी पारोळा येथे होता. त्या कार्यक्रमासाठी गोसावी व पाटील हे दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने दुचाकीला कट मारला व त्यात दोघे जण खाली पडले व त्याचवेळी मागून आलेल्या वाहनाचे टायर गोसावी यांच्या अंगावरुन गेले, असे सांगितले जात आहे. मात्र नेमकी घटना कशी घडली हे ठामपणे कुणीच सांगू शकले नाही. यात संदीप पाटील यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

सहायक पोलीस अधीक्षकांकडे विधी अधिकारी

दुर्गादासगिरी मधुकर गोसावी हे सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या कार्यालयात विधी अधिकारी म्हणून कार्यरत होते तर संदीप पाटील हे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. अनिल पाटील, संदीप पाटील व गोसावी तिघे मित्र असून एकाच कार्यालयात तिघांनी काम केलेले आहे. पाटील यांच्या आईच्या अंत्ययात्रेला जाणे शक्य झाले नाही, त्यामुळे बुधवारी गंधमुक्तीच्या निमित्ताने ते द्वारदर्शनाला जायला निघाले अन‌् काळाने अशी झडप घातली.

Web Title: The victim was a law enforcement officer on the highway