शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

किन्ही येथील ग्रामसभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 21:25 IST

पोलीस बंदोबस्त असताना तहकूब करावी लागली सभा

भुसावळ : तालुक्यातील किन्ही येथे ‘आपला गाव,आपला विकास’ अंतर्गत कृती आराखड्यासाठी आयोजित ग्रामसभेत १४ व्या वित्त आयोगाची सरपंच, उपसरपंचासह ग्रामसेवकांनी परस्पर विल्हेवाट लावली असा आरोप करून नागरिकांनी घरकुल, शौचालय , साफसफाई , गटारीवरील ढापे आदी विषयांवर ग्रामसभा चांगलीच गाजविली. सभेत गोंधळ झाल्यामुळे पोलिस बंदोबस्तात मागवण्यात आला. मात्र तरीही ही ग्रामसभा तहकूब करावी लागली.७ रोजी सकाळी ११ वाजता ही ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या आवारात घेतली होती. अध्यक्षस्थानी सरपंच हर्षा येवले या होत्या. प्रभारी ग्रामसेवक आनंद सुरवाडे, उपसरपंच प्रदीप कोळी, ग्रा.पं. सदस्य नलिनी पाटील, आशा तायडे, पुष्पा बाविस्कर, सुरेखा चौधरी, सुनंदा बोंडे, छाया सुरवाडे, किरण घुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उन्हाळ्यातील पाणी टंचाईसाठी मधुकर दामू चौधरी यांची विहीर अधिग्रहित केली होती. त्याबाबातचे मानधन अद्यापही मिळालेले नाही, अशीही तक्रार केली.भिल्ल समाजाचे लोक अद्यापही घरकुलापासून वंचितबाहेर गावावरुन येथे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळाला. मात्र गावातीलच भिल्ल समाज अनेक वर्षांपासून घरकुलांपासून वंचित आहे. ग्रामस्थांकडून माहिती अधिकारात विचारण्यात आलेली महिती देता येत नसल्यामुळे ग्रामसेवक विजय काकरवाल हे दीड महिन्यापासून सुटीवर आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये नारजी आहे. प्रभारी ग्रामसेवक आनंद सुरवाडे यांनी नुकताच पदभार घेतला आहे. त्यानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.नागरिकांचे आरोपगावातील विकास कामे ठप्प झाले, शौचालयाचे अनुदान बोगस लाभार्थ्यांना मिळाले असून यासाठी ३ हजार रुपये घेण्यात आले, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना १४ महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे सफाई व पाणी पुरवठा कर्मचारी दोन महिन्यांपासून कामावर नाही. पगाराचे आश्वासन देवूनही ते अद्याप झाले नाही अशा विविध विषयांवरुन गोंधळ घातल्यामुळे. अध्यक्षांनी सभा तहकुब केली. यामुळे प्रोसिडिंग बुकात फक्त १५ ग्रामस्थांच्या स्वाक्षºय झाल्या. गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रा.पं.ने पोलिस बंदोबस्तात सभा आयोजित केली होती. तालुका पो.स्टे.चे पो.नि. रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार यांच्यासह पोलिस व होमगार्ड यांनी सभेत कडक बंदोबस्त ठेवला.