शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा सुनावताच काळा हनुमान पतसंस्थेच्या संचालकांनी भरले २२ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:15 IST

ठेवीदार महिलेस ग्राहक न्यायलयाचा दिलासा

जळगाव : ठेवीची मुदत पूर्ण होऊनही गेल्या १२ वर्षांपासून ठेवीदारांना त्यांची रक्कम परत दिली जात नसल्याने भुसावळ येथील काळा हनुमान पतसंस्थेचे चेअरमन अभय नारायण राजे यांना अडीच वर्षे तर सहा संचालकांना दोन वर्षांचा कारावास सुनावताच संचालक मंडळाने ग्राहक न्यायालयाकडे २२ लाख भरले. रक्कम देण्यात आल्याने न्यायालयाचा आदेश रद्द झाला.या बाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ येथील काळा हनुमान पतसंस्थेत छाया नारायण पाटील, पंकज नारायण पाटील, प्रतिभा नारायण पाटील यांच्या २००४पासून ठेवी ठेवलेल्या होत्या. या ठेवींची २००७मध्ये मुदत पूर्ण झाली, मात्र या ठेवीदारांना सोसायटी व संचालक मंडळाने रक्कम परत केली नाही. त्यामुळे ठेवीदारांनी ग्राहक न्यायालयात २० तक्रारी अर्ज दाखल केले. २००८मध्ये तक्रारदारांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. तरीदेखील ठेवीदारांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी २०१०मध्ये निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केले. त्यावर वेळोवेळी सुनावणी होऊन ६ डिसेंबर रोजी ग्राहक न्यायालयाच्या अध्यक्षा व्ही.व्ही. दाणी, सदस्या पूनम मलिक, सदस्य सुरेश जाधव या पॅनलने निर्णय दिला. त्यात पतसंस्थेचे चेअरमन अभय नारायण राजे यांना अडीच वर्षाचा कारावास व दहा हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. तसेच इतर सहा संचालकांना दोन वर्षे कारावासी शिक्षा सुनावली. एकूण अठरा प्रकरणातील ही शिक्षा वेगवेगळी भोगायची असल्याचे आदेशात म्हटले. तसेच या वेळी तीन संचालक हजर नसल्याने त्यांच्याविरुद्ध वारंट काढण्यात आले. संचालक मंडळाने रक्कम दिल्यास हे आदेश रद्द ठरणार असल्याचेही नमूद केले.निकाल लागताच अर्धा तासात भरले २२ लाखपतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळास शिक्षा सुनावताच संचालक मंडळाने अर्धा तासात २२ लाख रुपयांचा भरणा केला. त्या वेळी ही रक्कम छाया नारायण पाटील या वृद्ध महिलेला देण्यात आली. रक्कम भरल्याने शिक्षेचे आदेश रद्द ठरविण्यात आले.तक्रारदारांतर्फे अ‍ॅड. हेमंत भंगाळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव