कला शिक्षक दत्तात्रय गंधे यांनी वीणावादन करणारा गणपती बाप्पा शाडू मातीतून साकारला. गणेश स्थापनेच्या वेळी ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं आगमन झालं. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील आणि नूतन ज्ञानेश्वर पाटील यांनी गणेश स्थापना पूजा केली. या वेळी मुख्याध्यापक हेमराज पाटील, कार्यक्रम प्रमुख संतोष चौधरी आणि अनुराधा धायबर उपस्थित होते.
राज माध्यमिक विद्यालय व सुनील महाजन ज्युनिअर काॅलेज
राज माध्यमिक विद्यालय व डाॅ. सुनील महाजन ज्युनिअर काॅलेज येथे महापाैर जयश्री महाजन यांच्या हस्ते श्रीची स्थापना करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
आर. आर. विद्यालय
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये श्रीची स्थापना करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी, सरला लाठी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. सुभाष जोशी, द्वारकाधीश जोशी यांनी पौरोहित्य केले. संगीत शिक्षक संजय क्षीरसागर यांनी गणपती गीत सादर केले. या वेळी उपाध्यक्ष दिलीप लाठी, सचिव मुकुंद लाठी, एम. के. कासट, विजय लाठी, प्राचार्या सोनाली रेभोटकर, परेश श्रावगी, डी. टी. पाटील, योगेश चौधरी, गजमल नाईक उपस्थित होते.
जय दुर्गा प्राथमिक विद्यालय
मेहरूण येथील जय दुर्गा प्राथमिक विद्यालय व कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय, मेहरूण हे गणेशाची स्थापना करण्यात आली. शरद पाटील यांनी मूर्तीचे पूजन केले.
सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालय
सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. मुख्याध्यापिका आशा साळुंखे यांच्या हस्ते श्रीची स्थापना करण्यात आली. या वेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.