Understand the language of the students sitting at the back | मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा समजून घ्या
मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा समजून घ्या

जळगाव- शिक्षक हा समाजातील अत्यंत जबाबदार घटक असून ओपिनियन मेकरच्या भूमिकेत असलेल्या भाषा विषयाच्या शिक्षकांनी कष्टकरी वर्गाच्या रोखठोक व रांगडी भाषेचे पदर स्वत: आधी समजवून घ्यावे. तरच ते विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करू शकतील असे प्रतिपादन नाटककार जयंत पवार यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यासप्रशाळा व संशोधन केंद्राच्यावतीने सोमवार पासून प्राध्यापकांच्या रिफ्रेशर कोर्सला प्रारंभ झाला. दोन आठवड्यांच्या या कोर्सच्या उदघाटन प्रसंगी बीज भाषण करताना ते बोलत होते़ यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तर संचालक प्रा.म.सु.पगारे अध्यक्षस्थानी होते.

विद्यार्थी-शिक्षकांमधील संवाद वाढवा
जयंत पवार म्हणाले की, साहित्य आणि भाषा शिकविणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाषा शिकविणे हा शिक्षकांनी आनंदाचा विषय समजायला हवा. शिक्षकांनी कष्टकरी व श्रमिक वर्गाच्या भाषांचे पदर समजून घ्यावेत. वर्गात मागच्या बाकावर बसणाºया मुलांची भाषा शिक्षकांनी समजून घ्यावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर कुलगुरु प्रा.पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, अलीकडच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद संपुष्टात आला आहे. तो वाढविणे गरजेचे आहे. डॉ. आशुतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. नेत्रा उपाध्ये व पुजा निचोले यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.प्रिती सोनी यांनी आभार मानले.
----------
मराठी नाटक हे हौशी कलावंतांनी जिवंत ठेवलंय
मराठी नाटक हे हौशी कलावंतांनी जिवंत ठेवलं असून आजच्या जागतिकीकरणाच्या काळात नाटक बदले आहे. ही कला प्रत्येक भागात, प्रदेशात ही वेगवेगळी आहे तिथल्या मातीशी संबंधित आहे, असे मत नाटककार जयंत पवार यांनी परिवर्तनतर्फे आयोजित माध्यामांच्या गर्दीत रंगभूमीचं अस्तित्व या चर्चासत्रात व्यक्त केले़
यावेळी कार्यक्रमात जेष्ठ कवी अशोक कोतवाल, किसन पाटील, रंगकर्मी व परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, चित्रकार राजू बाविस्कर, मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत, वसंच गायकवाड, डॉ किशोर पवार, हर्षल पाटील, कुणाल चौधरी, हर्षदा कोल्हटकर आदींची उपस्थिती होती़

बिनबियांच्या पिकांसारखी कलेची अवस्था
जयंत पवार पूढे म्हणाले की, आपला जागतिकीकरणाशी संबंध आला आणि आपल्या कलेतील सत्व गेले़ बिनबियांच्या पिकांसारखी आपल्या कलेची अवस्था होत आहे. व्यवसायिक रंगभूमी ही आपली खरी रंगभूमी नाही तर खरी रंगभूमी वेगळी आहे. आपल्या प्रदेशातील नाटकं आपण शोधली पाहिजेत. मुख्य धारेचं नाटक हे वेगळे असून ते सत्व तत्त्व शोधणं गरजेचं आहे. प्रत्येक काळाचा एक कलाप्रकार असतो आजच्या समाजाचं विखंडित होत जाणे हे प्रमुख कारण आहे़ त्यामुळे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व विखंडित झाल्याने सलगता अनुभवण्याची क्षमता प्रत्येकाची जवळपास संपत आली आहे. त्यामुळे आपल्या कला काळानुरूप बदलण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले़

 

Web Title: Understand the language of the students sitting at the back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.